गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
IND vs WI: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने दोन सामन्यांची मलिका २-० अशी जिंकली. या मालिकेत भारताने शानदार कामगिरी केली. विजयानंतर, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी शुभमन गिलच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे.
हेही वाचा : Ind vs WI : भारताची बातच निराळी! दिल्लीत मोडला स्वतःचाच विक्रम; वेस्ट इंडिजला धूळ चारून रचला इतिहास
गौतम गंभीर म्हणाला की, शुभमन गिलने खूप कमी वेळात स्वतःची एक परिपक्व कर्णधार म्हणून छाप पाडली. गौतम गंभीर म्हणाला की, “मला वाटते की गिलने कसोटी कर्णधार म्हणून त्याची सर्वात कठीण परीक्षा आधीच पास केली आहे. ती परीक्षा इंग्लंडमध्ये होती.” रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थिती देखील भारतीय संघाने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. त्या मालिकेत गिलने सर्वाधिक ७५४ धावा केल्या होत्या तर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध वर्षातील पाचवे कसोटी शतक देखील झळकावले.
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, “शुभमन गिलला माझा एकच सल्ला असणार आहे. तुमच्या स्वभावासोबत प्रमाणिक राह. त्याला कर्णधार बनवून कोणीही त्याच्यावर उपकार केलेले नसून तो पूर्णपणे त्यासाठी पात्र आहे. त्याने कठोर मेहनत केली आहेत आणि प्रत्येक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आहे. प्रशिक्षक आणखी वेगळ काय मागू शकतो?” गंभीरने असे देखील म्हटले की शुभमन गिलला ड्रेसिंग रूममधील सर्व खेळाडूंकडून मोठ्या प्रमाणात आदर मिळतो.
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने देखील प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की त्याचा संघ पराभूत झाला असला तरी, त्यांची कामगिरी सुधारली आहे. तो म्हणाला की, “या मालिकेत आम्हाला काही सकारात्मक बाबी देखील दिसून आली आहेत. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात आम्ही जॉन कॅम्पबेल आणि शाई होपच्या शतकांच्या जोरावर ३९० धावा उभ्या केल्या. ज्यामुळे संघाला आत्मविश्वास मिळणार आहे. ही कामगिरी आमच्यासाठी पुढे जाण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे.”
हेही वाचा : Ind vs WI : ध्रुव जुरेलने गाठला मैलाचा दगड! भारतासाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू