फोटो सौजन्य - बीसीसीआय
India vs West Indies Toss Update : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये दुसरा सामन्याला सुरुवात झाली. भारताच्या संघाने वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने अनेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला सामन्यामध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने शतक झळकावले होते त्याचबरोबर के एल राहुल याने देखील दमदार खेळी खेळून शतकीय खेळी खेळली होती.
साई सुदर्शन आणखी एकदा मागील सामन्यांमध्ये फेल ठेवला होता आजच्या त्याच्या कामगिरीवर क्रिकेट फॅन्सचे विशेष लक्ष असणार आहे. शुभमन गिलने मागील सामन्यामध्ये अर्धशतक झळकावले होते. आजच्या त्याच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. गोलंदाजीमध्ये कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने संघामध्ये कोणताही बदल केला नाही. कुलदीपने मागील सामन्यात त्याची कला दाखवली होती सुरु असलेल्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
🚨 Toss 🚨#TeamIndia won the toss and elected to bat. Updates ▶ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/A3KoVrucmM — BCCI (@BCCI) October 10, 2025
आम्ही प्रथम फलंदाजी करू, पहिल्या दिवशी फलंदाजीसाठी विकेट चांगली दिसते. आमच्यासाठी सातत्य महत्वाचे आहे. प्रत्येक सामन्यात आमची कामगिरी पुन्हा करणे आणि तीच भावना राखणे ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आम्ही अनेकदा बोलतो आणि या कसोटी सामन्यातही आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत. (कर्णधार होण्याबद्दल) खरे सांगायचे तर, फारसे काही नाही. मी अजूनही तोच व्यक्ती आहे, पण आता माझ्यावर निश्चितच अधिक जबाबदाऱ्या आहेत. पण मी जबाबदारीचा आनंद घेतो आणि माझे भविष्य खूप रोमांचक आहे (सर्व फॉरमॅटमध्ये प्रगती करत आहे). आमचा संघ सारखाच आहे.
IND W vs SA W : क्रांती गौडचा ‘जादुई झेल’, एका हाताने ताजमिन ब्रिट्स केलं बाद! Video Viral
दिल्लीतील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यावर हवामानाचा मोठा परिणाम होईल. पाचही दिवस आकाशात ढग राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोन्ही संघांवर परिणाम होईल. भारताचा नवा कर्णधार त्याचबरोबर युवा खेळाडूंनी कसोटी सायकलची चांगली सुरुवात केली आहे. विशेष म्हणजेच टीम इंडियाने इंग्लड दौऱ्यावर बलाढ्य संघाविरुद्ध अविश्वसनीय कामगिरी केली होती. ही मालिका अनिर्णयित राहिली. आजच्या सामन्यामध्ये केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल क्रीजवर आहेत, भारताला दमदार सुरुवातीची आशा आहे. सील्स गोलंदाजीची सुरुवात करेल.
IND W vs SA W : भारतीय महिला संघाच्या हाती दक्षिण आफ्रिका विरुद्ध निराशा! 3 विकेट्सने केला पराभव
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितिश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
रोस्टन चेस (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, टेग्नारिन चंद्रपॉल, अॅलिक अथानासे, शाई होप, टेविन इमलाच (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स