फोटो सौजन्य - आयसीसी
भारतीय महिला संघाचा विश्वचषकाचा तिसरा सामना काल साउथ आफ्रिकेविरुद्ध पार पडला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करून निराश केले. ऋचा घोष हिच्या जोरावर टीम इंडियाने 251 धावांचे लक्ष उभे केले होते. लॉरा वॉलवर्ट आणि नॅडिन डी क्लार्क यांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून दिला. ऋचा घोष खेळलेली 94 धावांची खेळी व्यर्थ ठरली. एकेकाळी भारताच्या हातात असलेला विजय शेवटच्या षटकांत निसटला. दक्षिण आफ्रिकेसाठी नॅडिन डी क्लार्कच्या धमाकेदार फलंदाजीने सामन्याचे चित्र उलगडले.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेतील पहिला सामना जिंकला, तर दोन सामने जिंकल्यानंतर भारताने तिसरा पराभव पत्करला. भारताच्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने ४८.५ षटकांत सात गडी गमावून हे लक्ष्य गाठले. कर्णधार लॉरा वोल्वार्डने ७० धावांची दमदार खेळी केली, तर क्लोई ट्रायॉनने ४९ धावा केल्या, परंतु विजयाची खरी नायिका नॅडिन डी क्लार्क होती, तिने फक्त ५४ चेंडूत नाबाद ८४ धावा केल्या, ज्यामध्ये आठ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.
जेव्हा दक्षिण आफ्रिकेला २४ चेंडूत ४१ धावांची आवश्यकता होती, तेव्हा सामना भारताच्या हातात असल्याचे दिसून आले. तथापि, ४७ व्या षटकात, नादिनीने भारतीय गोलंदाज क्रांती गौडच्या गोलंदाजीवर दोन षटकार आणि एक चौकार लगावत १८ धावा केल्या आणि परिस्थिती बदलली. तिच्या संयमी फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला सात चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला. नॅदिन डी क्लार्कने केवळ बॅटनेच नव्हे तर बॉलनेही योगदान दिले. तिने भारताच्या डावात दोन विकेट्स घेतल्या आणि नंतर बॅटने मॅच फिनिशरची भूमिका बजावली. तिच्या उत्कृष्ट ऑलराउंड कामगिरीसाठी तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ४९.५ षटकांत २५१ धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने ९४ धावांची शानदार खेळी केली. मानधना (४३) आणि प्रतिका रावल यांच्या भागीदारीने भारताने चांगली सुरुवात केली, परंतु मधल्या षटकांत विकेट्स पडण्याची मालिका सुरू झाली. एका वेळी संघाची धावसंख्या ६ बाद १०२ होती, त्यानंतर रिचाने अमनजोत कौर आणि नंतर स्नेह राणा यांच्यासोबत भारताचा डाव सावरला. तिने स्नेहसोबत ८८ धावांची भागीदारी करून भारताला २५० धावांपर्यंत पोहोचवले, परंतु ती शतकापासून फक्त सहा धावांनी कमी पडली.
Nadine de Klerk does it for South Africa as they defeat hosts India in a contest that went down to the wire in Visakhapatnam 🔥#CWC25 #INDvSA 📝: https://t.co/dJQBf7HG2O pic.twitter.com/5zSjaxnJxc — ICC (@ICC) October 9, 2025
दक्षिण आफ्रिकेकडून क्लो ट्रायॉन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने १० षटकांत तीन विकेट्स घेत भारताला सुरुवातीचा विजय मिळवून दिला. आयला आणि नादिनी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.