फोटो सौजन्य - बीसीसीआय
वेस्टइंडीज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे पहिला सामन्यांमध्ये खराब कामगिरीनंतर दुसरा सामना त्यांनी चांगली कामगिरी दाखवली. त्याचबरोबर भारतीय संघासमोर आव्हान देखील उभे केले. पहिला डावा मध्ये भारताच्या संघाने 518 धावा केल्या होत्या. यात वेस्टइंडीज च्या संघाने पहिल्या डावात 248 धावा करत फॉलोऑन केल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने 300 चा आकडा पार केला. आता फॉलोनंतर भारताला फलंदाजी करायचे आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने आपला पहिला डाव ५१८ धावांवर घोषित केला.
त्यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा डाव २४८ धावांवर गुंडाळला, ज्यामुळे त्यांना फॉलोऑन करावा लागला. त्यावेळी भारताकडे २७० धावांची आघाडी होती. या मालिकेतील वेस्ट इंडिजच्या फलंदाजीकडे पाहता, दुसऱ्या डावात ते या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतील असे कधीच वाटले नव्हते. तथापि, दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करून, वेस्ट इंडिजने केवळ भारताच्या धावसंख्येपर्यंत पोहोचले नाही तर आघाडीही घेतली, ज्यामुळे त्यांना चौथ्या डावात फलंदाजी करण्यास भाग पाडले.
Vaibhav Suryavanshi नव्या भूमिकेत! या संघाचे सांभाळणार उपकर्णधारपद, रणजी ट्रॉफीचे खेळणार सामने
यासोबतच, सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी एक आकडेवारी समोर आली आहे. फॉलोऑन करण्यास भाग पाडल्यानंतर चौथ्या डावात फलंदाजी करण्याचा हा भारताचा विक्रम आहे. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये ४१ वेळा फॉलो-ऑनची सक्ती केली आहे आणि फक्त तीन वेळा त्यांना चौथ्या डावात पुन्हा फलंदाजी करावी लागली आहे, त्यापैकी शेवटचा सामना नोव्हेंबर २०१२ मध्ये अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध होता. सध्याच्या संघातील कोणत्याही भारतीय खेळाडूने त्यावेळी पदार्पण केले नव्हते.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात कुलदीप यादवने ५ आणि रवींद्र जडेजाने ४ बळी घेतले होते, पण दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज विकेटसाठी तळमळत असल्याचे दिसून आले. मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पहिले दोन बळी लवकर घेतले, पण तिसरा बळी घेण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. या काळात जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी १५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. ही भागीदारी अखेर रवींद्र जडेजाने मोडली, पण तोपर्यंत वेस्ट इंडिज भारताच्या धावसंख्येच्या जवळ पोहोचला होता. कॅम्पबेलनंतर शाई होपनेही वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले.