फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा अंडर 19 संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. यामध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी एकदिवसीय मालिकेमध्ये धुमाकूळ घालून मालिका जिंकले होते. टीम इंडियाच्या अंडर 19 संघामधील असे काही खेळाडू आहेत जे आयपीएल देखील खेळतात. आयपीएलमध्ये आता नव्या नियम तयार करण्यात आला आहे. आयपीएल मध्ये खेळण्यासाठी कमीत कमी दोन देशांतर्गत सामने खेळणे गरजेचे आहे. आता लवकरच रणजी ट्रॉफीचा हंगाम सुरू होणार आहे आणि त्यामध्ये अनेक स्टार खेळाडू हे सामील होताना दिसणार आहेत.
२०२५ रणजी करंडक १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्याआधी, १४ वर्षीय धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण बक्षीस मिळाले आहे. सूर्यवंशी अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या शानदार दौऱ्यानंतर भारतात परतला, जिथे तो एकदिवसीय आणि कसोटी मालिका दोन्ही खेळला. आता, वैभव रणजी करंडकात बिहार संघासाठी धमाकेदार कामगिरी करताना दिसेल, कारण त्याला या स्पर्धेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨 14-year-old Vaibhav Suryavanshi has been named Bihar’s vice-captain for the first two matches of the Ranji Trophy 2025/26! 🏏👌#VaibhavSuryavanshi #Bihar #RanjiTrophy #Sportskeeda pic.twitter.com/4W70jYc1Ow — Sportskeeda (@Sportskeeda) October 13, 2025
बिहार क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉफीसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सूर्यवंशीचा संघात समावेश करण्यात आला आहे आणि वैभवला बिहार संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. साकिबुल गनी देखील संघाचे नेतृत्व करेल.
वैभव सूर्यवंशी यांनी बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, त्यांनी १० डावात १८ चौकार आणि एक षटकार मारून १०० धावा केल्या आहेत. २०२५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये बिहार आपला पहिला सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळेल. बिहारचा पहिला सामना अरुणाचल प्रदेशविरुद्ध पाटण्यातील मोईन-उल-हक स्टेडियमवर होईल.
भारतीय अंडर-१९ संघाकडून खेळताना, वैभव सूर्यवंशीने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याने दोन्ही देशांविरुद्ध शतके झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्ध, वैभवने पाच युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये १७४.०२ च्या स्ट्राईक रेटसह ३५५ धावा केल्या. वैभव सूर्यवंशी हा आयपीएल मध्ये सहभाग घेऊन हा सर्वात युवा खेळाडू आहे आयपीएल 2025 मध्ये ठरला. त्याचबरोबर त्याने राजस्थान रॉयल्ससाठी शतक देखील झळकावले.
📢 Bihar Squad Announced for 1st Two #RanjiTrophy Matches!
🧢 Captain: Sakibul Gani⁰⭐ Vice-Captain: Vaibhav Suryavanshi
A strong mix of youth & experience..⁰Vaibhav’s rise continues after a stellar IPL & U-19 season.. #TeamBihar #BiharCricket #Ranji2025 #VaibhavSuryavansh pic.twitter.com/vk9ScT97UC — Bihar Cricket Association (@BiharCriBoard) October 12, 2025
पियुष कुमार सिंग, भास्कर दुबे, साकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, बिपिन सौरभ, आमोद यादव, नवाज खान, साकिब हुसेन, राघवेंद्र प्रताप सिंग, सचिन कुमार सिंग, हिमांशू सिंग, खालिद कुमार आलम आणि सचिन आलम.