फोटो सौजन्य- JioHotstar
भारताचा संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने, पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावामध्ये फलंदाजी केल्यानंतर फोलोऑनची घोषणा केली होती. क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर निर्णयांमध्ये चुका होण्याची शक्यता कमी करतो. पण कधीकधी, तंत्रज्ञान देखील दिशाभूल करणारे असू शकते. ते स्पष्ट निकाल देऊ शकत नाही. दिल्लीमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी हे स्पष्ट झाले.
डीआरएस गमावल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह निराश दिसत होता आणि त्याने पंचांना आपली व्यथा व्यक्त करत म्हटले, “तुम्हाला माहित आहे की फलंदाज बाद झाला आहे, पण तंत्रज्ञान ते सिद्ध करू शकत नाही.” दिल्ली कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ही घटना घडली. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली ५५ वे षटक टाकत होते. षटकातील पाचवा चेंडू जॉन कॅम्पबेलच्या पॅडवर लागला. एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आले, परंतु पंचांनी नाही असे मान हलवली.
Vaibhav Suryavanshi नव्या भूमिकेत! या संघाचे सांभाळणार उपकर्णधारपद, रणजी ट्रॉफीचे खेळणार सामने
बुमराह, कर्णधार शुभमन गिल आणि यष्टिरक्षक ध्रुव जुरेल यांच्यात चर्चा सुरू झाली. बुमराहला यष्टिरक्षकाचा विश्वास होता, म्हणून गिलने डीआरएस घेतला.तिसऱ्या पंचांच्या पुनरावलोकनात चेंडू बॅटवरून जाताना थोडासा स्पाइक दिसून आला. त्याच वेळी चेंडू पॅडवरही आदळल्याचे दिसून आले. चेंडू बॅटला लागला की पॅडला हे ठरवण्यासाठी तिसऱ्या पंचांनी वारंवार रिप्लेचा आढावा घेतला. शेवटी, तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा मूळ निर्णय कायम ठेवला, कारण अल्ट्रा-एजमध्ये चेंडू पॅड आणि बॅटवर आदळतानाचे वेगळे स्पाइक दिसत नाहीत.
भारताने रिव्ह्यू गमावला आणि नॉट आउट निर्णय तसाच राहिला. रिव्ह्यू गमावल्यानंतर, बुमराह गोलंदाजी करण्यासाठी बाहेर पडताना हसला आणि मैदानावरील पंच इलिंगवर्थला म्हणाला, “तुम्हाला माहित आहे की तो बाद झाला आहे. पण तंत्रज्ञान ते सिद्ध करू शकत नाही.” बुमराहचे विधान स्टंप माइकवर कैद झाले आणि समालोचकांनाही हशा पिकला.
JASPRIT BUMRAH TO THE UMPIRE VIEW “You know, it was clearly out, but the technology just couldn’t prove it”#INDvsWI #jaspritbumrah #johncampbell #ShubmanGill #YashasviJaiswal 📸jiohotstar pic.twitter.com/xiUL4Owt4t — CricInformer (@CricInformer) October 13, 2025
दिल्ली कसोटीचे पहिले सत्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी जिंकले. या काळात भारताला फक्त एकच यश मिळाले. बुमराहच्या चेंडूपासून थोडक्यात बचावलेला कॅम्पबेल शतक झळकावल्यानंतर रवींद्र जडेजाने त्याला एलबीडब्ल्यू बाद केले. त्याने ११५ धावा केल्या. उपाहारानंतर मोहम्मद सिराजने शाई होपला बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. होपनेही आपले शतक पूर्ण केले आणि १०३ धावा केल्या.