India dominates on the first day in Delhi! Yashasvi Jaiswal's half-century takes the team to 318 runs, West Indies bowlers desperate
India vs West Indies Live, 2nd Test, Day 1 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यातील दूसरा कसोटी सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. यशस्वी जयस्वालच्या १७३ धावांच्या जोरावर भारताने दिवसाअखेर २ गडी गमावून ३१८ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांसमोर चांगलाच घाम गाळावा लागला. या दरम्यान सी सुरदर्शनने देखील शानदार ८७ धावा करून भारताच्या स्कोअरमध्ये मोठे योगदान दिले आहे.
दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्याट दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिलचा निर्णय योग्य ठरला. भारताची सुरवात चांगली झाली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या सलामीवरांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. केएल राहुल ३८ धावा काढून बाद झाला. त्याला जोमेल वॉरिकनने बाद केले. त्यानंतर मैदानात आला साई सुदर्शन. साई सुदर्शन आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने १९३धावंची भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले.
हेही वाचा : Ind vs WI : जसप्रीत बुमराहचा जलवा कायम! भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये केला ‘हा’ कारनामा
या दरम्यान यशस्वी जयस्वालने शतक पूर्ण केले. तर साई सुदर्शन शतक झळकवेल असे वाटत असताना तो ८७ धावांवर बाद झाला. त्याने १६५ चेंडूचा सामना करत ८७ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार लगावले. त्याला देखील जोमेल वॉरिकनने बाद केले. त्यानंतर मैदानात कर्णधार शुभमन गिल मैदानात आला आणि त्याने यशस्वी जयस्वालल चांगली साथ दिली. या दरम्यान यशस्वी जयस्वालने आपले दीड शतक देखील पूर्ण केले. दिवसाअखेर गिल आणि जयस्वाल यांनी आधीच ४४ धावांची भागीदारी रचली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वाल १७३ धावांवर तर शुभमन गिल २० धावांवर नाबाद होते. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकन हा एकमेव गोलंदाज यशस्वी ठरला. त्याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
भारत : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिज : जॉन कॅम्पबेल, टेगनारिन चंद्रपॉल, अॅलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (कर्णधार), टेविन इमलाच (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खरी पियरे, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स