यशस्वी जयस्वाल(फोटो-सोशल मीडिया)
Yashasvi Jaiswal sets a record in Delhi Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दूसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात असलेल्या सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जयस्वालने दमदार शतक झळकवले आहे. या शतकासह त्याने एक मोठी कामगिरी देखील केली आहे.
यशस्वी जयस्वालने २४ वर्षांच्या वयाच्या आधी सात किंवा त्याहून अधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या काही निवडक खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. या यादीत पहिले नाव म्हणजे ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांचे आहे. ब्रॅडमन यांनी २४ वर्षांच्या वयाच्या आधी १२ शतके झळकवण्याची किमया साधली आहे. तसेच मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर यादीत क्रीडा जगात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. सचिनने २४ वर्षांच्या वयाच्या आधी ११ शतके ठोकली होती. तर गारफिल्ड सोबर्स नऊ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत यशस्वीसह पाच इतर खेळाडू चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत. यामध्ये यशस्वी जयस्वाल, जावेद मियांदाद, ग्रॅमी स्मिथ, अॅलिस्टर कुक आणि केन विल्यमसन या खेळाडूंचा समावेश आहे. या पाचही खेळाडूंनी २४ वर्षापूर्वी प्रत्येकी सात शतके झळकवण्याची किमया केली आहे.
हेही वाचा : Ind vs WI : KL Rahul ची मोठी झेप! विराट-रोहित जोडीच्या खास यादीत सामील; WTC मध्ये केला ‘हा’ कारनामा
२४ वर्षापूर्वी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे निवडक खेळाडू:
यशस्वी जयस्वाल हा २३ व्या वर्षी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा दुसरा फलंदाज आहे. शिवाय, भारतीय संघाकडून २३ व्या वर्षी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा यशस्वी जयस्वाल हा दुसराच फलंदाज आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे. त्याने २३ व्या वर्षी ११ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी शतके झळकावली आहेत. जयस्वाल सात कसोटी शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे, तर रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर प्रत्येकी पाच कसोटी शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.
हेही वाचा : IPL 2026 चे बिगुल वाजले! संघ कोणाला करणार रिटेन? वाचा सविस्तर