
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
महिला प्रीमियर लीग सुरू आहे, यामध्ये जगभरातील महिला खेळाडू सामील झाले आहे. महिला प्रीमियर लीग झाल्यानंतर भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाची एकदिवसीय मालिका आणि टी20 मालिका होणार आहे, त्याचबरोबर आता कसोटी सामना देखील खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने या मालिकेआधी काही बदल केले आहेत. त्याचबरोबर एसीसी रायझिंग स्टार आशिया कप संघासाठी भारत अ संघाची देखील बीसीसीआयने घोषणा केली आहे.
बीसीसीआयने भारतीय एकदिवसीय आणि टी20 संघामध्ये एक बदल केला आहे. भारताची विकेटकिपर कमालीनी हिला महिला प्रीमियर लीग खेळताना गंभीर जखमी झाली होती. आता ती भारतीय क्रिकेट संघामधून देखील बाहेर केले आहे. कमालीनी हिला बाहेर केल्यानंतर आता तिच्या जागेवर उमा चेत्री हिला संघामध्ये स्थान मिळाले आहे. या झालेल्या संघामध्ये अनेक नवे चेहरे पाहयला मिळणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकामध्ये जखमी झालेली प्रतिका रावल हिचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे.
भारताच्या अ संघ एसीसी रायझिंग स्टार महिला आशिया कप, २०२६ खेळताना दिसणार आहे. ही स्पर्धा थायलंडमध्ये खेळवली जाणार आहे. पहिला सामना हा 13 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारताच्या अ संघाचे कर्णधारपद हे राधा यादवकडे सोपवले जाणार आहे. त्याचबरोबर डब्लूपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना या संघामध्ये स्थान मिळाले आहे.
🚨 News 🚨#TeamIndia’s squad for Test against Australia Women & India A squad for ACC Rising Stars Asia Cup announced. Details 🔽 | #AUSvIND https://t.co/F8AyqxIFhn — BCCI Women (@BCCIWomen) January 24, 2026
हरमनप्रीत कौर [कर्णधार], स्मृती मानधना [उपकर्णधार], शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, अमनजोत कौर, ऋचा घोष [विकेटकिपर], उमा चेत्री [विकेटकिपर], प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणा, क्रांती गौड, वैण्षवी शर्मा.
हुमैरा काझी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दिया यादव*, तेजल हसबनीस, नंदनी कश्यप [विकेटकिपर], ममता M [विकेटकिपर]*, राधा यादव [कर्णधार], सोनिया मेंधिया, मिन्नू मणी, तनुजा राव, प्रेमिता कण्वर, तनुजा कण्वर, ज. नंदनी शर्मा.