
IND W vs SL W: Indian team announced against Sri Lanka! Women players will take to the field for the first time after the World Cup
Indian squad announced against Sri Lanka : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे. कौरच्या नेतृत्वाखाली पंधरा सदस्यीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. एकदिवसी विश्वचषकात शानदार कामगिरी करणारी शेफाली वर्मा टी-२० संघात पुन्हा परतली आहे, तर अमनजोत कौरचा देखील संघात समावेश केला गेला आहे. वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी यांच्यावर देखील निवडकर्त्यांनी विश्वास दर्शवला आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत हरमनप्रीत कौर टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे तर स्मृती मानधना उपकर्णधार असणार आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अलिकडेच मोठे बदल झाले असले तरी, मानधना मैदानारवर परतून संघाला एक मजबूत नेतृत्व प्रदान करेल.
भारतीय संघातील सर्वात मोठी बातमी म्हणजे शेफाली वर्मा सहा महिन्यांनंतर टी-२० संघात पुनरागमन करत आहे. शेफालीने १२ जुलै २०२५ रोजी इंग्लंडविरुद्ध तिचा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला होता. एकदिवसीय विश्वचषकात आपल्या कामगिरीने प्रभावित करणाऱ्या अमनजोत कौरचाही टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. पदार्पण करणाऱ्यांमध्ये १९ वर्षीय फिरकीपटू वैष्णवी शर्मा आणि जी. कमलानी पहिल्यांदाच टी-२० संघाचा भाग असणार आहेत.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला २१ डिसेंबरपासून ससुरुवात होणार आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येईल. तर दुसरा सामना २३ डिसेंबर रोजी त्याच ठिकाणी खेळला जाईल. तसेच तिसरा टी-२० सामना २६ डिसेंबर रोजी आणि चौथा सामना २८ डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. तर पाचवा आणि शेवटचा सामना ३० डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
🚨 News 🚨#TeamIndia’s squad for the 5⃣-match T20I series against Sri Lanka Women announced. More details – https://t.co/CS41IPCECP#INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uqavBNZpEL — BCCI Women (@BCCIWomen) December 9, 2025
हेही वाचा : बाबर आझमचा नवा अवतार पाहिलात का? ‘या’ लीगमध्ये आजमवणार नशीब; चाहत्यांना पडली भुरळ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमाह रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, ऋचा घोष (WK), जी कमलिनी (WK), श्रीचरणी, वैष्णवी शर्मा