
रोहित शर्मा आणि हरमीनप्रित कौरचा विशेष सन्मान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना विशेष सन्मान
माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली रोहितने २०२४ चा आयसीसी टी२० विश्वचषक आणि २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिला. त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि आता त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल. दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५ चा महिला विश्वचषक जिंकला. भारतातील महिला क्रिकेटच्या विकासातही तिने मोठे योगदान दिले आहे.
रविवारी झाली घोषणा
रविवार, २५ जानेवारी रोजी सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली, ज्यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश आहे. या वर्षी, सरकारने एकूण १३१ व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये पाच जणांना दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार, पद्मविभूषण देण्यात आला आहे. तेरा जणांना पद्मभूषण आणि एकूण ११३ जणांना पद्मश्री देण्यात आली आहे. क्रीडा जगतातून एक पद्मभूषण आणि आठ पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आहेत.
२६ जानेवारी रोजी रोहित आणि हरमनप्रीत कौरसह अनेक खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येयणार आहेत. यामध्ये काही प्रसिद्ध नावांचा समावेश आहे ज्याची यादी आम्ही या बातमीतून देत आहोत. याशिवाय पद्मविभूषण पुरस्कारही घोषित करण्यात आले आहेत. जाणून घ्या या खेळाडूंची नावे.
या खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार मिळाला