अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
Abhishek Sharma creates history in T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिला सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेन टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. या सामन्यात भारताचा सलामीवर अभिषेक शर्माने मैदानावर उतरताच आणखी एक विक्रम रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये फक्त एका धावेने त्याने एका कॅलेंडर वर्षात १,५०० टी-२० धावा पूर्ण केल्या आणि इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणाराय तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोन दिग्गजांनी ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा : बाबर आझमचा नवा अवतार पाहिलात का? ‘या’ लीगमध्ये आजमवणार नशीब; चाहत्यांना पडली भुरळ
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माने आता ३७ डावांमध्ये ४२ च्या सरासरीने १,५०० धावांचा टप्पा गाठला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० धावा काढण्याच्याबाबतीत वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन अव्वल स्थानी आहे. त्याने २०२४ मध्ये ४०.८९ च्या सरासरीने फलंदाजी करताना २,३३१ धावा फटकावल्या आहेत.
तत्पूर्वी, मंगळवारी बाराबती स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चार वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवले आहेत. हार्दिक पंड्या भारतीय संघात पुनरागमन करत असून संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांना संघात स्थान दिले गेले नाहीत.
कटकच्या या मैदानावर भारताने आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये फक्त एकच सामना जिंकला आहे आणि दोन पराभव पत्करावे लागले आहेत, दोन्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होते.
भारत T20 संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (W), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिका T20 संघ : क्विंटन डी कॉक(W), एडन मार्कराम(कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे






