Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs England Lions : इंग्लंडमध्ये भारत अ संघाच्या फलंदाजांचा वरचष्मा! गोलंदाजांची सुमार कामगिरी; पहिली कसोटी अनिर्णित

भारत अ संघाने पहिल्या डावात ५५७ धावा केल्या. तर इंग्लंड लायन्सने पहिल्या डावात ५८७ धावा उभारल्या होत्या. दुसऱ्या डावात, भारत अ संघाच्या फलंदाजांनी २ गडी गमावून २४१ धावा करून सामना अनिर्णित राखला. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 03, 2025 | 03:00 PM
IND Vs England Lions: India A batsmen excel in England! Bowlers perform poorly; First Test drawn

IND Vs England Lions: India A batsmen excel in England! Bowlers perform poorly; First Test drawn

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs England Lions: इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी सपाट फलंदाजीच्या ट्रॅकचा चांगलाच फायदा घेऊन भरपूर धावा केल्या आहेत. भारत अ संघाने पहिल्या डावात ५५७ धावा केल्या. तर इंग्लंड लायन्सने पहिल्या डावात ५८७ धावा उभारल्या होत्या. दुसऱ्या डावात, भारत अ संघाच्या फलंदाजांनी २ गडी गमावून २४१ धावा करून सामना अनिर्णित राखला.

इंग्लंड लायन्सच्या टॉप-ऑर्डर फलंदाजांनी शानदार कामगिरी केल्यानंतर, खालच्या ऑर्डरने देखील दमदार कामगिरी करत भारत अ गोलंदाजांना चांगले दमवले आहे. यजमान संघाने पहिल्या सत्रात वर्चस्व राखले आणि पहिल्या डावात ५८७ धावा करून ३० धावांची आघाडी देखील मिळवली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल (६० चेंडूत ६४), कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (८७ चेंडूत ६८), ध्रुव जुरेल (नाबाद ५३) आणि नितीश कुमार रेड्डी (४७ चेंडूत नाबाद ५२) यांनी अर्धशतके झळकावली असून ६ जून रोजी नॉर्थम्प्टन येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आत्मविश्वास वाढवला आहे.

हेही वाचा : IPL 2025 जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस! उपविजेत्या संघाला मिळणार इतकी रक्कम

जुरेलचे सलग दुसरे अर्धशतक

भारत अ संघाने शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात ४१ षटकांत २ बाद २४१ धावा केल्या, त्यानंतर २५ षटके शिल्लक असताना सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणे जवळजवळ निश्चित असल्याने भारत अ संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी रेड्डी यांना चौथ्या क्रमांकावर पाठवले. त्याचप्रमाणे, पहिल्या डावात ९४ धावा करणाऱ्या जुरेलने सामन्यातील दुसरे अर्धशतक झळकावलेया आहे.

दुसऱ्या डावात भारत अ संघाची चांगली सुरुवात

जयस्वालने दुसऱ्या डावाची सुरुवात डावखुरा वेगवान गोलंदाज जोश हलला षटकार लगावून केली. जेवणानंतरच्या सत्रात जयस्वाल आणि ईश्वरन यांनी प्रत्येकी आठ चौकार लगावले होते. इंग्लंड लायन्सची गोलंदाजी भारतीय आक्रमणाइतकीच सामान्य दिसून आली होती आणि कोणीही फलंदाजांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आणू इच्छित नव्हते असे दिसत होते.

पहिल्या डावात ९२ धावा करणारा सरफराज खान आणि पहिल्या डावात द्विशतक झळकवणारा करुण नायर यांना पुरेसा फलंदाजीचा वेळ मिळाला होता आणि त्यामुळे त्यांना फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही. नायर कसोटी संघाचा भाग आहे. त्याआधी, इंग्लंड लायन्सने सात बाद ५२७ धावांवरून सुरुवात केली होती तेव्हा खालच्या फळीतील फलंदाजांनी ६० धावा केल्या होत्या.

हेही वाचा : टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर! संघाची झाली घोषणा! 31 वर्षीय खेळाडूला केले कर्णधार

भारतीय गोलंदाजी निराशाजनक

एडी जॅक (२५) आणि अजित सिंग डेल (नाबाद २७) यांनी शेवटच्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचत भारत अ संघाच्या गोलंदाजांना निराश केले. इंग्लंड लायन्सच्या डावामध्ये टॉम हेन्स (१७१), मॅक्स होल्डन (१०१) आणि डेन मौस्ली (११३) या तीन डावखुऱ्या फलंदाजांनी  शतक लगावले आहेत. भारत अ संघाकडून, मुकेश कुमार हा इतर गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. त्याने २५ षटकांत ९२ धावांत ३ धावा घेतल्या, तर शार्दुल ठाकूरने २८ षटकांत १०५ धावांत २ बळी घेतले.

 

Web Title: India a batsmen excel in england bowlers perform poorly first test drawn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Karun Nair

संबंधित बातम्या

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची गोष्टच वेगळी! दुसऱ्यांच्या घरात जाऊन षटकारांचा पाऊस पडतो; एकदा वाचाच 
1

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची गोष्टच वेगळी! दुसऱ्यांच्या घरात जाऊन षटकारांचा पाऊस पडतो; एकदा वाचाच 

भारतीय संघातून वगळल्यानंतर करुन नायरला मिळाली या संघामधून खेळण्याची संधी! झाली मोठी घोषणा
2

भारतीय संघातून वगळल्यानंतर करुन नायरला मिळाली या संघामधून खेळण्याची संधी! झाली मोठी घोषणा

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
3

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

India vs West Indies Test Series : अरेरे…या पाच सदस्यांचा वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पत्ता कट!
4

India vs West Indies Test Series : अरेरे…या पाच सदस्यांचा वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पत्ता कट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.