फोटो सौजन्य : Windies Cricket
वेस्ट इंडीजचा संघ हा इंग्लड दौऱ्यावर आहे, सध्या इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज या दोन संघामध्ये कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा आजपासुन खेळवला जाणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ हा इंग्लड आणि आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामधील टी-20 मालिकेला सुरुवात ही ६ जूनपासुन होणार आहे. ही मालिका तीन सामन्याची होणार आहे. आता वेस्ट इंडीज बोर्डाने इंग्लडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे, यासंदर्भात जाणून घ्या.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने इंग्लंडसोबतच्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी ३१ वर्षीय खेळाडूला वेस्ट इंडिज टी२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची टी-२० मालिका ६ ते १० जून दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यासाठी शाई होपला वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर ब्रॅडन किंगला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय, स्टार अष्टपैलू जेसन होल्डर देखील बऱ्याच काळानंतर संघात परतला आहे.
RCB VS PBKS : गोलंदाज करणार कमाल की फलंदाजांची चालणार मनमानी? वाचा अहमदाबादच्या खेळपट्टीचा अहवाल
होल्डरने २०२४ मध्ये वेस्ट इंडिजसाठी शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. याशिवाय आंद्रे रसेलचेही संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पूरनने शानदार कामगिरी केली. या हंगामात त्याने फलंदाजी करताना १४ सामन्यांमध्ये ५२४ धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ५ अर्धशतके निघाली. आता त्याला मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
CWI Announces Squads for West Indies T20Is against England and Ireland.🏏🌴
Read More🔽 https://t.co/2R3U0aMQaH
— Windies Cricket (@windiescricket) June 2, 2025
इंग्लंडनंतर वेस्ट इंडिजचा संघ आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये एक टी-२० मालिकाही खेळवली जाईल. या मालिकेतही शाई होप वेस्ट इंडिजचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तथापि, उपकर्णधार ब्रँडन किंगला या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.
शाई होप (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग (उपकर्णधार), एविन लुईस, गुडाकेश मोती, रोवमन पॉवेल, आंद्रे रसेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड.