Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs AUS A: कुमार कुशाग्रचं शतक, गोलंदाजांचा भेदक मारा; कांगारूंचा माज उतरवला! भारताने १६२ धावांनी उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

IND A beat Aus A by 162 runs in test match: पहिल्या कसोटीत भारत 'अ' संघाने ऑस्ट्रेलिया 'अ' संघाचा १६२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने आघाडी घेतली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 25, 2026 | 03:09 PM
IND A beat Aus A

IND A beat Aus A

Follow Us
Follow Us:
  • भारतीयांच्या तावडीत कांगारू अडकले
  • शतक, अर्धशतक अन् विकेट्सचा पाऊस
  • IND A चा दणदणीत विजय
देवदत्त पडिक्कलच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाने पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा १६२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या चौथ्या दिवशी ३६३ धावांचे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या २०० धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. कुमार कुशाग्र आणि पडिक्कल यांनी फलंदाजीत चमकदार कामगिरी केली, तर अंशुल कंबोज, तुषार देशपांडे, शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कुशाग्रला उत्कृष्ट कामगिरीसाठी प्येअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले.

Asian Games 2026: भारतीय शूटर्सचा ‘पदकांवर निशाणा’! ऐश्वर्य-नीरज-रुद्रांक्षची कमाल; ५० मीटर रायफल ३ पोझिशन्समध्ये भारताला रौप्य

भारताने पहिला सामना १६२ धावांनी जिंकला

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने पहिल्या डावात ३३४ धावांचा डोंगर उभा केला. कुमार कुशाग्रने ११३ धावांचे शानदार शतक झळकावले, तर साई सुदर्शनने ५७ धावा केल्या. तनुष कोटियनने ६९ धावा आणि अंशुल कंबोजने २३ धावांची भर घातली. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १७१ धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे भारताला १६३ धावांची आघाडी मिळाली.

यानंतर, भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत १९९ धावा केल्या आणि आपली आघाडी ३६२ धावांपर्यंत वाढवली. कर्णधार देवदत्त पडिक्कलने दुसऱ्या डावात ५९ धावा केल्या, तर कुमार कुशाग्रने नाबाद ४६ धावा केल्या. ३६३ धावांचे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाचा संघही दुसऱ्या डावात अपयशी ठरला आणि केवळ २०० धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही, दुसऱ्या डावात ५२ चेंडूंमध्ये ४७ धावा करणारा फर्गस ओ’नील हा संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या शानदार कामगिरीमुळे भारताने हा सामना तब्बल १६२ धावांनी जिंकला.

भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलिया गारद

या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३६३ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, परंतु भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर कांगारू संघ अवघ्या २०० धावांवर गारद झाला. दुसऱ्या डावात भारताकडून तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत शानदार गोलंदाजी केली, तर अंशुल कंबोज आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. पहिल्या डावात शम्स मुलानीने भारतासाठी भेदक गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतले होते. त्याने दोन्ही डावांत मिळून एकूण ७ विकेट्स घेतले. पहिल्या डावात तुषार आणि तनुष यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले, तर अंशुल आणि प्रफुल्ल हिंगे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. मालिकेतील दुसरा सामना २९ सप्टेंबर रोजी पुदुचेरी येथे खेळला जाईल. त्यानंतर ६ ऑक्टोबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल.

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

Web Title: India a best australia a first unofficial test kumar kushagra player of the match shams mulani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • IND vs AUS 1st Test Match

संबंधित बातम्या

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा
1

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.