Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Asia cup 2026: पाकिस्तानचा खेळ खल्लास! आता कोणाचा गेम करणार? सेमीफायनलमध्ये भारताचा ‘या’ संघाशी होणार महामुकाबला

India Beat Pakistan semi final match Women's asia cup: भारतीय संघाने महिला गट फेरीत तीन संघांना दणदणीत पराभूत करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. संघाने आता उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 06, 2026 | 06:29 PM
semi final match Women's asia cup

semi final match Women's asia cup

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा ‘फडशा’ पाडला
  • आता सेमीफायनलमध्ये कोणाशी पंगा?
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
महिला आशिया कप २०२६ स्पर्धा सध्या दुबईमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत आठ संघ खेळत आहेत. यातील गट फेरीचे सामने लवकरच संपणार आहेत. ‘अ’ गटामध्ये भारत, पाकिस्तान, हाँगकाँग आणि थायलंड यांचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत आपली प्रभावी कामगिरी सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने तिन्ही संघांना सहज हरवून उपांत्य फेरी गाठली आहे. भारताने आपल्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला हरवले. भारत आता सहा गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे.

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral

भारत अ गटात गुणतालिकेत आघाडीवर

भारताने गटफेरीत सलग तीन सामन्यात तीन विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. ‘अ’ गटातील दुसरा संघ असलेला पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. पाकिस्तान सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. थायलंड आणि हाँगकाँग उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. पाकिस्तानचा शेवटचा सामना हाँगकाँगविरुद्ध आहे.  पाकिस्तानने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

श्रीलंका ‘ब’ गटात आघाडीवर

श्रीलंका ‘ब’ गटात आघाडीवर आहे. श्रीलंकेने आतापर्यंत आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले असून, त्यांचा नेट रन रेट पाचच्या जवळपास आहे. श्रीलंका या गटात अव्वल स्थानी कायम राहील. श्रीलंका उपांत्य फेरीसाठी जवळपास पात्र ठरला आहे. बांग्लादेशने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. इंडोनेशियाविरुद्ध ७१ धावांनी विजय मिळवून बांग्लादेश दुसऱ्या स्थानावर कायम आहे. या गटातून दोन्ही संघांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.

सेमिफायनलमध्ये भारत कोणाविरुद्ध भिडणार?

पहिला उपांत्य सामना ‘अ’ गटातील अव्वल संघ आणि ‘ब’ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ यांच्यात होईल. दुसरा उपांत्य सामना ‘अ’ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ आणि ‘ब’ गटातील अव्वल संघ यांच्यात होईल. भारत ‘अ’ गटात अव्वल संघ आहे, त्यामुळे आता त्यांचा सामना ‘ब’ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी होईल. सध्याच्या परिस्थितीनुसार, ‘ब’ गटात बांग्लादेश दुसऱ्या क्रमांकावर असेल. त्यामुळे, उपांत्य सामन्यात भारताचा सामना बांग्लादेशविरुद्ध होण्याची शक्यता आहे.

कधी होणार सेमिफायनल सामना?

महिला आशिया कपचा पहिला उपांत्य सामना १० सप्टेंबर रोजी खेळला जाईल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि सोनी लिव्ह ॲपवर थेट पाहता येईल. भारतीय संघ यावेळी ही स्पर्धा जिंकण्यासाठी एक प्रबळ दावेदार आहे

मैदान बदललं, अंदाज नाही! Mohammed Shami च्या नावावर आणखी एक ‘शतक’; Duleep Trophy ची फायनल ठरली ऐतिहासिक

Web Title: India beat pakistan in womens asia cup 2026 likely to play semi final against bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • IND W vs PAK W
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

एक डाव, दोन वर्ल्ड रेकॉर्ड! Shafali Verma ने पाकिस्तानविरुद्ध केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी; २२व्या वर्षी दिग्गजांनाही टाकले मागे
1

एक डाव, दोन वर्ल्ड रेकॉर्ड! Shafali Verma ने पाकिस्तानविरुद्ध केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी; २२व्या वर्षी दिग्गजांनाही टाकले मागे

IND W vs PAK W : भारताने पाकिस्तानला सात गडी राखून केले पराभूत; सलग तिसऱ्यांदा नोंदवला विजय
2

IND W vs PAK W : भारताने पाकिस्तानला सात गडी राखून केले पराभूत; सलग तिसऱ्यांदा नोंदवला विजय

IND W vs PAK W: लयं बेकार इज्जत काढली! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद
3

IND W vs PAK W: लयं बेकार इज्जत काढली! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद

आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार
4

आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.