Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG; गिल-राहुलची शतकी जुगलबंदी; अफगाणिस्तानविरुद्ध भारताची मजबूत पकड, पहिला डाव 564 वर घोषित

IND vs AFG Test Day 2 First Innings: अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात भारताने धडाकेबाज पहिली फलंदाजी करत डाव घोषित केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 07, 2026 | 02:36 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • गिल-राहुलची जोडी चमकली
  • भारताने उभा केला धावांचा डोंगर
  • पहिला डाव 564 धावांवर घोषित
भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामना न्यू चंदीगडमधील मुल्लांपूर येथे खेळला जात आहे. आज, म्हणजेच रविवार, ७ जून रोजी सामन्याचा दुसरा दिवस सुरू आहे. या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या दिवशीही वर्चस्व कायम राखले. कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या शानदार खेळीनंतर भारताने पहिल्या डावात विशाल स्कोर उभारला. भारताने आपला ८ विकेट्स गमावून ५६४ धावांवर पहिला डाव घोषित केला. या डावात केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली, तर साई सुदर्शन, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतके केली.

Men’s U18 Asia Cup: सुवर्णिम कामगिरी! जपानला नमवत ‘भारत अंडर-18 आशिया कपचा’ विजेता

भारताची धडाकेबाज फलंदाजी

मुल्लांपूर कसोटी सामन्यात, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मानव सुथारची भारतीय संघात निवड झाली. तर, नांगेयालिया खरोटीने अफगाणिस्तानकडून कसोटी पदार्पण केले. सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे भारतीय संघाच्या बाजूने होता. सलामीवीर केएल राहुलने १६५ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण करत आपले १२ वे कसोटी शतक झळकावले आणि संघाला भक्कम सुरुवात करून दिली. या खेळीत ११ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलनेही सर्वाधिक १२६ धावांची संयमी पण प्रभावी खेळी केली. गिलनेही ११ चौकार आणि एका षटकारासह १३८ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे गिलचे ११ वे कसोटी शतक होते. युवा फलंदाज साई सुदर्शनने ८१ धावा करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. या तिघांच्या भागीदारीमुळे भारताने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी सावध सुरुवात केली. अफगाण गोलंदाजांनीही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. मोहम्मद सलीम साफीने शुभमनला बाद करून भारताची चौथी विकेट मिळवली. ऋषभ पंतने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत धावगती वाढवली. पंतला शतक करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, पण कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. ऋषभने १२१ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांसह ८१ धावा केल्या. पदार्पण करणाऱ्या मानव सुथारच्या रूपाने भारताची सातवी विकेट पडली. त्यानंतर सफीने १२ चेंडूंमध्ये २२ धावा करणाऱ्या मोहम्मद सिराजलाही बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनेही अर्धशतक झळकावत भारताची धावसंख्या ५५० पार करण्यास मदत केली. मानव सुथारने २८, यशस्वीने २४, मोहम्मद सिराजने २२ आणि ध्रुव जुरेलने १९ धावा केल्या. अखेरीस भारताने ५६४-८ धावांवर डाव घोषित केला.

Crucial runs. Crucial partnership. 🤝 Washington Sundar & Manav Suthar with a gritty 5️⃣0️⃣-run stand 🙌 Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/EqdjCtGtX7 — BCCI (@BCCI) June 7, 2026

मोहम्मद सलीम सफीची दमदार गोलंदाजी

अफगाणिस्तानकडून मोहम्मद सलीम सफीने उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६ महत्त्वाचे विकेट्स घेत भारताला आणखी मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. झियाउर रहमान आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी प्रत्येकी विकेट घेतले. मात्र भारतीय फलंदाजांच्या सातत्यपूर्ण भागीदारीसमोर अफगाण गोलंदाज संघर्ष करताना दिसले.

भारतीय संघ: केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

अफगाणिस्तान संघ: सेदीकुल्ला अटल, रहमानउल्ला गुरबाज, अब्दुल मलिक, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अफसर झाझाई (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, नांगेलिया खरोती, झियाउर रहमान शरीफी आणि मोहम्मद सलीम सफी.

IND vs AFG: रणजी ते टीम इंडिया! कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी कॅप मिळताच ‘मिस्ट्री स्पिनर’ चर्चेत

Web Title: India declare 564 against afghanistan test 2026 in first innings gill rahul scored centuries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • IND vs AFG

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.