
भारताने दक्षिण आफ्रिकेला १०१ धावांनी चिरडले (Photo Credi t- X)
1ST T20I. India Won by 101 Run(s) https://t.co/tiemfwcNPh #TeamIndia #INDvSA #1stT20I @IDFCfirstbank — BCCI (@BCCI) December 9, 2025
भारताची प्रथम फलंदाजी
त्याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतला प्रथम फलंदाजीसाठी अमंत्रित केले. भारतीय संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १७५ धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ५९ धावा केल्या. त्याने २८ चेंडूंच्या खेळीदरम्यान सहा चौकार आणि चार षटकार मारले. भारताची ५ धावांवर पहिली विकेट गेली. शुभमन गिल ४ धावा करून माघारी गेला. त्यानंतर अभिषेक शर्मा १७ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव देखील काही खास करू शकला नाही. तो १२ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेले तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी छोटेखानी भागीदारी करत भारताला सावरले. मात्र जास्त वेळ या दोघांना तग धरता आला नाही. तिलक वर्मा २६ तर अक्षर पटेल २३ धावा करून बाद झाला.
हार्दिक नावाचे तुफान!
त्यानंतर आलेला हार्दिक पांड्याने मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्लाबोल चढवला. त्याने तळाच्या खेळाडूल सोबत घेत चांगली फटकेबाजी केली. हार्दिकने २५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २०० च्या वर होता आणि तो ५९ धावा करून नाबाद राहिला आणि भारताला १७५ यापर्यंत पोहचवले. शिवम दुबे ११ धावा करून बाद झाला तर पंड्या ५९ धावा आणि जिटेश शर्मा १० धावांवर नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी न्गिडी सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेची सर्वात वाईट कामगिरी
१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली. अर्शदीप सिंगने क्विंटन डी कॉकला शून्यावर बाद केले. त्यानंतर कर्णधार ट्रिस्टन स्टब्सला अर्शदीपने १४ धावांवर बाद केले. १४ धावा काढल्यानंतर कर्णधार अॅडम मार्करामला अक्षर पटेलचा येणारा चेंडू वाचता आला नाही आणि तो क्लीन बोल्ड झाला.
संपूर्ण संघ फक्त ७४ धावांवर बाद
डेवाल्ड ब्रेव्हिसने चांगली सुरुवात केली, परंतु २२ धावा काढल्यानंतर त्याने बुमराहचा चेंडू थेट सूर्यकुमार यादवच्या हातात टाकला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पॅव्हेलियनच्या शर्यतीत अडकले आणि संपूर्ण संघ फक्त ७४ धावांवर बाद झाला. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वात कमी धावसंख्या आहे.