तिलक वर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Tilak Verma’s 89-meter six in Cuttack : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करायला मैदानात उतरला आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ बाद १७५ धावा काढल्या. या सामन्यात तिलक वर्माने एक शानदार षटकार ठोकून सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. त्याने टोलवलेला चेंडू थेट स्टेडियमबाहेरचे गेला. याचा आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल फक्त २ चेंडूत ४ धावा करून आबाद झाला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव मोठी खेळी करू शकला नाही आणि ११ चेंडूत १२ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेक शर्मा देखील आपली जादू दाखवू शकला नाही. त्याने १२ चेंडूत १७ धावा काढल्या आणि बाद झाला. पाचव्या क्रमांकावर आलेला अक्षर पटेलने २१ चेंडूत २३ धावा करून बाद झाला.
तिलक वर्माने भारताचा डाव सांभाळला. त्याच्या डावातील सर्वात शानदार क्षणांपैकी एक पाहायला मिळाला. भारतीय डावाच्या १० व्या षटकात, तिलकने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अँरिच नोर्खियाला एक उत्तुंग षटकार खेचला आहे. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मारलेला फटका थेट स्टेडियमच्या बाहेरचे गेला. वृत्तानुसार, तिलक वर्माने ठोकलेला षटकार सुमारे ८९ मीटर लांब होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. तिलक वर्मा ३२ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि १ षटकार ठोकला.
Sound 🔛 for this one! 🔊🔊 A terrifying hit from #TilakVarma and the ball sails over the roof of the stadium. 🏟#INDvSA, 1st T20I, LIVE NOW 👉 https://t.co/tqu4j7Svcm pic.twitter.com/Xf96CwC3AB — Star Sports (@StarSportsIndia) December 9, 2025
हार्दिकने भारताचा डाव सांभाळून घेत भारताला १७५ पर्यंत पोहचवले. त्याने २५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २०० च्या वर होता. त्याने २८ चेंडूत ५९ धावा करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले. शिवम दुबे ११ धावा करून बाद झाला तर पंड्या ५९ धावा आणि जितेश शर्मा १० धावांवर नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर लुथो सिपामलाने २ तर फरेराने १ विकेट घेतली.
हेही वाचा : IND vs SA T20I series : कटकमध्ये हार्दिक पंड्याने मॅच खेचली! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचे लक्ष्य






