Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा आज सलग दुसऱ्या दिवशी सामना; श्रीलंकेसोबत टीम इंडिया भिडणार, संघात कोणता बदल? आकडेवारी काय सांगते?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होता. मात्र या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळं रिझर्व डेला, म्हणजे काल सामना खेळविण्यात आला. यात भारताने पाकवर दणदणीत विजय मिळवला. वेळापत्रकानुसार आज भारताचा श्रीलंकेसोबत सामना आहे. त्यामुळं आज भारताला सलग तिस-या दिवशी मैदानावर घाम गाळावा लागणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 12, 2023 | 07:49 AM
भारताचा आज सलग दुसऱ्या दिवशी सामना; श्रीलंकेसोबत टीम इंडिया भिडणार, संघात कोणता बदल? आकडेवारी काय सांगते?
Follow Us
Close
Follow Us:

कोलंबो : आशिया कप (Asia Cup) 2023 सुपर 4 मध्ये दोन दिवस चाललेल्या सर्वात हायव्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकवर भारताने काल ऐतिहासिक २२८ धावांनी विजय मिळवला आहे. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात सामना खेळविण्यात आला, पण सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना रिझर्व डेला सोमवारी पुन्हा खेळविण्यात आला. ज्या ठिकाणी सामना थांबला तेथून सामना पुन्हा खेळवला गेला. रविवारी २ बाद १४७ धावा भारताने केला. काल तिथून सुरुवात करताना के एल राहुल व विराट कोहलीने विक्रमी भागिदारी करत वैयक्तिक शतक करत संघाला धावांचा डोंगर उभा करुन दिला. के एल राहुलने १११ धावा तर विराट कोहलीने १२२ धावांची खेळी साकारत ३५६ धावांचं लक्ष्य पाकिस्तानसमोर दिले. मात्र, पाकची सुरुवात निराशाजनकच झाली. आणि फक्त पाकिस्तानला १२८ धावा करता आल्या, त्यामुळं भारताने ऐतिहासिक म्हणजे २२८ धावांनी विजय मिळवला आहे. यानंतर आज सलग दुस-या दिवशी भारत आणि श्रींलका (India Vs Sri Lanka ) यांच्यात सामना होणार आहे. (India’s match today for the second day in a row; T India will clash with Sri Lanka, what change in the team)

भारताला आज सलग खेळावे लागणार

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होता. मात्र या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळं रिझर्व डेला, म्हणजे काल सामना खेळविण्यात आला. यात भारताने पाकवर दणदणीत विजय मिळवला. वेळापत्रकानुसार आज भारताचा श्रीलंकेसोबत सामना आहे. त्यामुळं आज भारताला सलग तिस-या दिवशी मैदानावर घाम गाळावा लागणार आहे. आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. दासून शनाका श्रीलंकेचं तर रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता दिसत नाही.

आकडेवारी काय सांगते?

श्रीलंका आणि भारत यांच्यातील अजूनपर्यंतचा इतिहास पाहता, दोन्ही संघात एकूण 165 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 165 पैकी 96 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 57 सामन्यात विजय मिळवला आहे. 1 सामना अनिर्णित राहिला आहे. तर 11 सामन्यांचा निकाल लागू शकला नाहीये. त्यामुळं आज कोण जिंकून अंतिम फेरी गाठणार याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.

भारतीय संभाव्य संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा.

श्रीलंका संभाव्य संघ

दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मदुशन.

Web Title: India match today for the second day in a row india will clash with sri lanka what change in the team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2023 | 07:49 AM

Topics:  

  • Asia Cup
  • india
  • nepal
  • pakistan
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
2

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
3

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.