BRICS counters Trump tariffs dollar decline begins
BRICS counters Trump tariffs : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक अर्थकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी भारत, चीन, रशिया आणि ब्राझीलसह अनेक ब्रिक्स देशांवर मोठ्या प्रमाणात शुल्क लादले असून त्याला प्रत्युत्तर म्हणून ब्रिक्सने अमेरिकेविरुद्ध ठाम भिंत उभारली आहे. या घडामोडींमुळे डॉलरच्या जागतिक वर्चस्वावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा युक्तिवाद आहे की, अमेरिकेची ‘सततची व्यापारतूट’ थांबवण्यासाठी आणि डॉलरची ताकद टिकवण्यासाठी हे शुल्क आवश्यक आहे. परंतु तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी स्पष्ट केले आहे की हे धोरण अमेरिकेसाठी आत्मघातकी ठरू शकते. त्यांच्या मते, या निर्णयामुळे अमेरिका जागतिक अर्थव्यवस्थेपासून हळूहळू वेगळी पडेल आणि इतर देश अमेरिकेकडून दूर जातील.
यापूर्वी भारताने ब्रिक्सच्या काही निर्णयांवर ‘व्हेटो’ लावून अमेरिकेला अडचणीत आणली नव्हती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधला आहे. “ग्लोबल साऊथची भागीदारी” असे वर्णन करत मोदींनी या सहकार्याला नवा आयाम दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बैठक घेतली आहे. या घडामोडींमुळे ब्रिक्समधील एकजूट अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
ट्रम्प यांनी आरोप केला आहे की भारत आणि चीन मिळून डॉलरला कमकुवत करण्याच्या कटात सहभागी आहेत. यासाठी त्यांनी भारतावर २५%, चीन-रशियावर ५०% आणि दक्षिण आफ्रिकेवर ३०% टॅरिफ लादले आहे. इतकेच नव्हे, तर ब्राझीलवर लादलेले करही आर्थिक कारणांमुळे नसून माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यावरील खटल्याशी संबंधित असल्याचे विश्लेषक सांगतात. बोल्सोनारो हे ट्रम्प यांचे जवळचे असल्याने त्यांना वाचवण्यासाठी ब्राझीललाच लक्ष्य केले जात असल्याचे बोलले जाते.
ब्रिक्समध्ये चीन, रशिया, भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिकेबरोबरच इराण, इजिप्त, इथिओपिया आणि यूएई यांचाही समावेश झाला आहे. एवढा मोठा गट डॉलरविरोधी अजेंड्यावर एकत्र आला तर अमेरिकन चलनाला मोठा धक्का बसू शकतो. याच मुद्द्यावरूनच ट्रम्प सतत ‘ब्रिक्स हा अमेरिका विरोधी गट’ असल्याचे सांगत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
कोलंबिया विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनीही इशारा दिला आहे की, “जागतिक राजकारण आता बहुध्रुवीय बनले आहे. अमेरिकेचे साम्राज्यवादी मॉडेल टिकणार नाही.” तर अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनीही चेतावणी दिली आहे की भारतावर टॅरिफ लादल्यामुळे तो अधिकाधिक रशिया-चीनकडे झुकू शकतो. सध्या घडणाऱ्या सर्व घडामोडी एकाच दिशेने सूचित करतात डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे ब्रिक्सची एकजूट मजबूत झाली आहे आणि अमेरिकेच्या डॉलर वर्चस्वाला आव्हान देणारे नवे समीकरण आकार घेत आहे.