Who has played the most matches in the T20 Asia Cup? Hardik Pandya has a great chance to surpass him
T20 Asia Cup : आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. यावेळी आशिया कप T20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. आगामी आयआयसी विश्वचषक पाहता, आशिया कप टी 20 स्वरूपात खेळवण्यात येत आहे. यापूर्वी, आशिया कप फक्त दोनदा T20 स्वरूपात खेळवण्यात आला आहे. आशिया कप पहिल्यांदाच 2016 मध्ये टी 20 स्वरूपात खेळवण्यात आला होता. त्यानंतर 2022 मध्ये आशिया कप टी 20 स्वरूपात खेळला गेलाआहे. आता तिसऱ्यांदा ही स्पर्धा टी 20 स्वरूपात खेळली जाणार आहे. या टी 20 स्वरूपातील आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने कोणत्या खेळाडूने खेळले आहेत. यावर बद्दल आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : पाकिस्तानची आशिया कपमधून माघार! ‘या’ संघाला झाला फायदा; भविष्यातील स्पर्धांवर होणार परिणाम
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नावावर टी 20 स्वरूपातील आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम जमा आहे. त्याच्यासोबतच, हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार दासुन शनाकाच्या नावावर देखील जमा आहे. ज्याने कोहलीच्या बरोबरी इतकेच सामने खेळलेले आहेत. तथापि, या कामगिरीबद्द सांगायचे झाल्यास कोहलीने फलंदाजीने दमदार कामगिरी केली आहे. तर शनाकाची कामगिरी तुलनेने निराशाजनक राहिली आहे.
भारताच्या अनुभवी खेळाडू विराट कोहलीने आशिया कप टी-२० चे दोन्ही हंगामावेळी संघांचा महत्वाचा भाग राहिलो आहे. या दरम्यान, त्याने एकूण १० सामने खेळले असून त्याने आशिया कप टी-२० मध्ये सर्वाधिक धावा देखील केल्या आहेत. तो या स्पर्धेच्या टी-२० स्वरूपात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने ८५.८० च्या सरासरीने ४२९ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये एक शतकसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने टी-२० आशिया कपमध्ये ४० चौकार आणि ११ षटकारांची आतिषबाजी केली आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याने चार झेल देखील टिपले आहेत.
हेही वाचा : टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
श्रीलंकेचा माजी कर्णधार दासुन शनाकाने टी-२० आशिया कपमध्ये एकूण १० सामने खेळले असुन त्याने १४.५५ च्या सरासरीने १३१ धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये त्याने ३ बळी घेतले आहेत. शनाकानंतर रोहित शर्माचा नंबर लागतो त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण ९ सामने खेळले आहेत. रोहित शर्माने ९ सामन्यांमध्ये ३०.११ च्या सरासरीने एकूण २७१ धावा केल्या. या यादीत तिसऱ्या नंबरवर हार्दिक पांड्याचे नाव घ्यावे लागते, त्याने टी-२० आशिया कपमध्ये 8 सामने खेळले असून 16.60 च्या सरासरीने 83 धावा केल्या आहेत. सतेच त्याने 11 बळी देखील टीपले आहेत. आशिया कप 2025 मध्ये हार्दिक पंड्याल विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुढे जाण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला केवळ 3 सामने खेळण्याची गरज आहे.