India W vs AUS W 1st ODI 2025: आज, 14 सप्टेंबर रोजी भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट टीम आणि ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट टीम यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (ODI Series 2025) पहिला मुकाबला खेळला जात आहे. हा रोमांचक सामना न्यू चंडीगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लांपूर येथे सुरू आहे.
आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 56 एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया महिला संघाचे पारडे जड राहिले असून, त्यांनी 46 सामने जिंकले आहेत. तर, भारतीय महिला संघाने केवळ 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या मालिकेत भारतीय संघ आपले आकडे सुधारण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान एलिसा हीली हिच्या हातात आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात दमदार झाली आणि सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. निर्धारित 50 षटकांमध्ये भारतीय संघाने 7 गडी गमावून 281 धावा केल्या.
𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!#TeamIndia posted 281/7 on the board! 💪
6⃣4⃣ for Pratika Rawal
5⃣8⃣ for vice-captain Smriti Mandhana
5⃣4⃣ for Harleen DeolOver to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/Fw3TUl2thL#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/AUhrBa6yKX
— BCCI Women (@BCCIWomen) September 14, 2025
भारताकडून प्रतिका रावलने सर्वाधिक 64 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान तिने 96 चेंडूत ६ चौकार लगावले. तिच्याव्यतिरिक्त स्मृती मानधनाने 58 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाकडून मेगन शुट्टने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर, अलाना किंग, एनाबेल सदरलँड, किम गार्थ आणि ताहलिया मॅकग्राथ यांनी प्रत्येकी एक-एक बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकांत 282 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघ ही लढत जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील.