14 Sep 2025 06:56 PM (IST)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा टी-20 सामना 2024 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता, जिथे भारताने कमी धावसंख्येच्या सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला होता. भारताने 19 षटकांत 119 धावा केल्या होत्या परंतु 20 षटकांत सात गडी गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ केवळ 113 धावा करू शकला.
14 Sep 2025 06:24 PM (IST)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
सलमान आगा (कर्णधार), सॅम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक), फखर जमान, हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद, हुसेन तलत, हसन अली, खुशदिल शाह, हॅरिस रौफ, मोहम्मद वासिम जूनियर, सलमान मिर्झा.
आज एशिया कप २०२५ मध्ये टीम इंडिया आपला दुसरा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा बहुचर्चित सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी, भारताने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात युएईचा एकतर्फी पराभव केला होता, तर पाकिस्तानने ओमानविरुद्ध विजय मिळवला होता. यंदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्व क्रीडा संबंध तोडण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, सरकारच्या नवीन क्रीडा धोरणानुसार, भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, पण एशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांच्याविरुद्ध खेळणार आहे.