IND vs PAK: आज 2025 च्या आशिया कपमधील सर्वात मोठा सामना आहे. दुबईमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटची मोठी लढाई होणार आहे. जेव्हा जेव्हा हे दोन संघ समोरासमोर येतात, तेव्हा रोमांच शिगेला पोहोचतो. या सामन्याची उत्सुकता इतकी असते की, रस्ते पूर्णपणे रिकामे दिसतात. मात्र, यावेळी ‘बॉयकॉट’च्या चर्चांमुळे सामन्याची पूर्वीसारखी ‘हायप’ दिसत नाहीये. सध्या, दोन्ही संघ दुबईमध्ये जोरदार टक्कर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.
आजचा भारत आणि पाकिस्तानमधील सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, सामन्याचा टॉस संध्याकाळी 7.30 वाजता होईल, तर सामन्याला रात्री 8.00 वाजता सुरुवात होईल.
Match 6 ⚔️
Arguably the most-anticipated match-up is here!
India are set to face Pakistan in what promises to be a humdinger! 🤜🤛#INDvPAK #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/Z81wvCau8o— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 14, 2025
या हंगामात दुबईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. पण, सुरुवातीला नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांनाही चांगली मदत मिळते. या खेळपट्टीवर 180 धावांचा स्कोर सहजपणे राखता येतो. दवचा फारसा परिणाम दिसत नाही, त्यामुळे टॉस जिंकणारी टीम प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकते.
आशिया कप 2025 चे प्रसारण अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे, तुम्ही टीव्हीवर भारत-पाकिस्तानचा सामना सोनी स्पोर्ट्स 1, सोनी स्पोर्ट्स 3, सोनी स्पोर्ट्स 4 आणि सोनी स्पोर्ट्स ५ वर पाहू शकता. जर तुम्हाला मोबाईलवर सामना पाहायचा असेल, तर तुम्ही सोनी लिव्ह (SonyLIV) ॲप आणि वेबसाइटवर हा महामुकाबला लाईव्ह स्ट्रीम करू शकता.
आमच्या अंदाजानुसार, या सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे. प्रत्येक बाबतीत टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. मात्र, पाकिस्तान हा एक असा संघ आहे जो कधीही काहीही करू शकतो, त्यामुळे सामना खूपच रोमांचक होण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेवन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेवन: सॅम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक), फखर जमान, सलमान अली आगा, हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, सुफियान मुकीम, अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.