Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs England 4th Test : सुनील गावस्कर यांनी बेन स्टोक्सला धरलं धारेवर! तू असं का केलंस…

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स चर्चेत आहे. आता महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही बेन स्टोक्सवर टीका केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 28, 2025 | 03:01 PM
फोटो सौजन्य – Youtube (Sony Sports Network)

फोटो सौजन्य – Youtube (Sony Sports Network)

Follow Us
Close
Follow Us:

टिम इंडियाचा झालेला इंग्लडविरुद्ध सामन्यामध्ये इंग्लडच्या खेळाडूंनी केलेले कृत्य सध्या जगभरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यावर क्रिकेट चाहत्यांच्या अनेक तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक क्रिकेट तज्ञांनी देखील त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स चर्चेत आहे. त्याने या चौथ्या सामन्यात  बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये धुव्वाधार कामगिरी केली. त्याने शतक आणि ५ विकेट घेण्याचा दुहेरी पराक्रम केला. पण त्याहूनही अधिक, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना शतकापासून वंचित ठेवण्यासाठी त्याने केलेल्या युक्तीची बरीच चर्चा आहे. 

संजय मांजरेकर यांनी त्याच्या वागण्याची तुलना एका बिघडलेल्या मुलाशी केली आहे, तर आर. अश्विन यांनी त्याच्या दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही बेन स्टोक्सवर टीका केली आहे. जडेजा आणि सुंदर यांना शतकापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नाही, तर त्याच्या बढाईखोरपणा आणि ढोंगीपणाबद्दल. लीड्स येथील पहिली कसोटी जिंकल्यानंतर बेन स्टोक्सने अभिमानाने सांगितले की, जरी भारताने ६०० धावांचे लक्ष्य दिले असते तरी आम्ही विजयासाठी खेळलो असतो. पहिल्या कसोटीत भारताने चौथ्या डावात इंग्लंडला ३७२ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, जे यजमान संघाने ५ विकेट गमावून साध्य केले.

योगायोगाने, बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ६००+ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर इंग्लंडच्या काही खेळाडूंनी म्हटले होते की भारत घाबरला आहे, म्हणून त्यांनी ६००+ धावांच्या आघाडीनंतर डाव घोषित केला. फक्त एका सामन्यानंतर, इंग्लंडचा ‘आम्ही ६०० धावांचे लक्ष्य दिले तरी…’ हा ‘आत्मविश्वास’ फसवा ठरला. भारताने ३३६ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

IND VS ENG Test : जसप्रीत बुमराह पाचवा कसोटी सामना खेळणार? गौतम गंभीरं दिले अचूक उत्तर

सुनील गावस्कर यांनी इंग्लंडच्या कर्णधाराच्या बढाईखोरपणा आणि ढोंगीपणावर हल्ला चढवला आणि सोनी स्पोर्ट्सवर म्हटले की जर ते शुभमन गिलच्या जागी असते तर त्यांनी स्टोक्सला काही अस्वस्थ करणारे प्रश्न नक्कीच विचारले असते. ते म्हणाले, ‘प्रश्न विचारता येतात – इंग्लंडने खूप वेळ फलंदाजी केली का? त्यांनी डाव लवकर घोषित करायला हवा होता का? जेव्हा भारताने बर्मिंगहॅममध्ये ६०० पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली तेव्हा इंग्लंडच्या काही खेळाडूंनी पत्रकार परिषदेत म्हटले होते – भारत घाबरला होता म्हणून त्यांनी आम्हाला ६०० धावा दिल्या. पण मला आठवते की मी आधी कुठेतरी वाचले होते की त्यांनी आम्हाला ६०० धावा द्या, आम्ही काहीही पाठलाग करू शकतो. भारताने असेच काहिसे केले आणि इंग्लडचा संघ ३३६ धावांनी पराभव झाला.

Web Title: India vs england 4th test sunil gavaskar holds ben stokes on edge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • ben stokes
  • cricket
  • India vs England
  • Sports
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

BPL मध्ये मॅच फिक्सिंग! तपासात बांग्लादेशी क्रिकेटपटूंच्या काळ्या कारनाम्यांचा केला खुलासा
1

BPL मध्ये मॅच फिक्सिंग! तपासात बांग्लादेशी क्रिकेटपटूंच्या काळ्या कारनाम्यांचा केला खुलासा

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral
3

UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral

मोहम्मद सिराजच्या गाडीच्या नंबरचं नातं जर्सीशी…व्हायरल फोटोने चर्चेला सुरुवात
4

मोहम्मद सिराजच्या गाडीच्या नंबरचं नातं जर्सीशी…व्हायरल फोटोने चर्चेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.