फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लंड मॅचेस्टर कसोटी सामना काल २८ जुलै रोजी पार पडला. या सामन्यात भारताचा संघ एक वेळ अशी होती जेव्हा टीम इंडिया या सामन्यात चौथ्या दिनी सर्व विकेट्स गमावणार अशी अटकळ बांधली जात होती. त्याच वेळेला भारताचे फलंदाज भारताचा कर्णधार शुभमन गिल, के एल राहुल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी इंग्लंडच्या विजयावर पाणी फेरलं. भारताच्या संघाने शून्य धावा असताना दोन विकेट्स गमावल्यानंतर पाच दिवसांचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाने तीन शतके आणि राहुल ९० धावांची खेळी खेळली आणि घरच्या मैदानावर इंग्लंडच्या संघाला गुडघे टेकायला भाग पाडले.
या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तथापि, चौथ्या दिवशी असे वाटत होते की इंग्लंडचा संघ हा सामना डावाने जिंकेल. परंतु भारतीय फलंदाजांनी सर्व आशा धुळीस मिळवल्या. सामन्यानंतर बेन स्टोक्स रवींद्र जडेजावर रागावला . यामुळे त्याने हस्तांदोलनही केले नाही, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे . खेळाच्या शेवटच्या क्षणी स्टोक्स सामना बरोबरीत आणू इच्छित होता . यासाठी त्याने जडेजाला ऑफर दिली . पण जडेजाने सामना बरोबरीत आणण्याचा निर्णय घेतला नाही आणि स्टोक्सला शेवटपर्यंत खेळण्यास सांगितले . त्यानंतर स्टोक्स संतापला.
दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला. परिणामी स्टोक्सने सामन्यानंतर जडेजाशी हस्तांदोलन केले नाही, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्याला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. भारताच्या संघाने त्याच्या हातुन सामना हिसकावला आणि दोन दिवसांमध्ये फक्त २ विकेट्स गमावुन मालिकेत टिकुन राहिले. भारताकडून जडेजा आणि सुंदर यांनी ऐतिहासिक शतक झळकावले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले .
Ben Stokes refused to shake hands with Washington Sundar & Ravindra Jadeja.. Because they destroyed his dream? Sportsmanship anyone?#INDvsENGTest #jadeja #tendulkarandersontrophy pic.twitter.com/j04istrciD — JIGNESH܁ᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠ (@jignesh03011976) July 27, 2025
वॉशिंग्टन सुंदरने २०६ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. त्याने ९ चौकार आणि १ षटकार मारला. याशिवाय रवींद्र जडेजानेही १८५ चेंडूत १०७ धावांची नाबाद खेळी केली. जडेजाने १३ चौकार आणि १ षटकार मारला. दोघांनीही शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि सामना बरोबरीत आणण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३५८ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ६६९ धावा केल्या. इंग्लंडने ३११ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारताने ० धावांवर २ विकेट गमावल्या . त्यानंतर केएल राहुलने ९० आणि गिलनेही १०३ धावा केल्या