फोटो सौजन्य – X (ICC)
भारत विरुद्ध इंग्लड चौथ्या कसोटी सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना हा मॅचेस्टर येथे पार पडला. पाच दिवसांच्या या सामन्यात चार दिवसांपर्यंत भारताचा संघ हा सामना हरणार असे चित्र दिसत होते. पहिल्या तीन दिवसांमध्ये भारताच्या संघाने एकही सेशन जिंकला नव्हता. भारताच्या संघाकडे तिसरा दिनापर्यंत ३०० हून अधिक धावांची धावांची आघाडी होती. ज्याप्रकारे इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या इनिंग मध्ये सुरुवात केली होती तीम इंडियाचा इंग्लंडचा संघ पराभव करणार असे दिसून येत होते पण भारताचे फलंदाज हार न मानता शेवटपर्यंत लढत राहिले आणि सामना ड्रॉपर्यंत नेला.
भारताच्या संघाची काही ठिकाणी चांगली फलंदाजी राहिली तर काही फलंदाजांनी फारच निराश केले. या दोन्ही संघाची चार इनिंगमध्ये कशी कामगिरी राहिली या संदर्भात जाणून घ्या. पहिल्या इनिंग बद्दल सांगायचं झालं तर इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकले होते आणि भारताच्या पदरी पहिले फलंदाजी आली. भारताचे संघाने पहिले फलंदाजी करत 358 धावा केल्या होत्या. इंग्लंडचे संघाने फलंदाजीला सुरुवात केली आणि इंग्लिश संघ थांबता थांबेना. इंग्लंडच्या संघाने दुसरे इनिंग मध्ये 669 धावा केल्या. यामध्ये जो रूट आणि बेन स्टोक्स फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना भरपूर धुतलं.
Special comeback 👏
Resolute batting performance ✨
An incredible effort from #TeamIndia batters in the 2nd innings in Manchester 🙌 #ENGvIND pic.twitter.com/OsEXhghmV6
— BCCI (@BCCI) July 27, 2025
भारताच्या संघाला या मालिकेमध्ये जिवंत राहायचे असल्यास टीम इंडियाला या सामन्यामध्ये विजय मिळवावा लागेल किंवा सामना ड्रॉ करणे गरजेचे होते. तिसऱ्या इनिंगची सुरुवात झाली आणि क्रिस वोक्स गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने ३ चेंडू टाकले आणि यशस्वी जयस्वाल अडचणीत पहायला मिळाला. ४ चेंडूवर त्याने यशस्वी जयस्वाल याचा विकेट घेतला आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. जयस्वालचा विकेट केल्यानंतर साई सुदर्शन फलंदाजीला आला होता आणि त्याच्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. भारताचा संघर्ष शून्य धावा असताना दोन विकेट गमावून टीम इंडियावर अडचणींचा डोंगर उभा राहिला.
शुभमन आणि राहुल यांनी दमदार फलंदाजी केली आणि भारताच्या संघाला संकटातून बाहेर काढले. पाचव्या दिनी पहिला सेशनमध्ये राहुलचा भारताचे संघाने सुरुवातीला विकेट गमावला. त्यानंतर सर जडेजा फलंदाजीला न येता वॉशिंग्टन सुंदर याला फलंदाजीसाठी पाठवले. भारताच्या कर्णधाराने शतक पूर्ण केल्यानंतर त्यात तो देखील विकेट गमावून बसला. रवींद्र जडेजा फलंदाजीला आल्यानंतर परत तिचा वेग वाढला आणि या दोघांनीही शतक झळकावली. भारताच्या संघामधील दोन फलंदाजांना सोडून मैदानात उतरलेल्या चारही फलंदाजांनी 90 किंवा 90 पेक्षा जास्त धावा केल्या. पुढील सामना हा ओव्हल मैदानावर होणार आहे.