IND Vs NZ Semifinal
भारत विरुद्ध न्यूझीलंड : वनडे वर्ल्ड कप २०२३ मधील सर्वात रोमांचक सामना आज होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज धर्मशालाच्या मैदानात रंगतदार सामना होणार, यात शंकाच नाही. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत आघाडीवर राहणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघाने आतापर्यंत आपले चार चार सामने जिंकले आहेत. मागील ३३ वर्षांतील आयसीसी स्पर्धेचा इतिहास पाहिला तर न्यूझीलंडचे पारडे जड आहे. पण टीम इंडिया सध्या भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे सामना रोमांचक होईल.
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सध्या शानदार फॉर्मात आहेत. दोन्ही संघाने आतापर्तंयचे सर्व सामने एकतर्फी जिंकले आहेत. दोन्ही संघ संतुलीत आहेत त्यामुळे आताच कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. जो संघ मैदानात सर्वोत्तम कामगिरी करेल, तोच विजयी होईल. आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वनडे क्रिकेटमधील ओव्हरऑल हेड टू हेड आकडे भारताच्या बाजूने आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत ११६ वनडे सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५८ तर न्यूझीलंड संघाने ५० सामन्यात विजय मिळवला आहे. सध्या आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडाचा संघ पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. २०२३ च्या सुरुवातीला दोन्ही संघामध्ये तीन सामन्याची मालिका झाली होती, त्यामध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवला.