फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या संघाचा ८ नोव्हेंबर रोजी मालिकेचा पहिला T२० सामना पार पडला. या सामन्यात संजू सॅमसन आणि भारतीय फिरकी गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला होता. या विजयासह भारताच्या संघाकडे चार सामान्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेता आली आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव आणि कंपनीला दुसरा सामना जिंकून मालिका पराभवाचा धोका दूर करायचा आहे. आजच्या सामना भारताचा संघाने जिंकल्यास टीम इंडियाला पुढील दोन सामन्यांमध्ये फक्त १ सामना जिंकल्यास मालिका नावावर करता येणार आहे. तर दुसरीकडे या मालिकेत बरोबरी साधण्याकडे दक्षिण आफ्रिकेची नजर असेल.
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. सामन्याचा नाणेफेक सात वाजता होणार आहे.
हेदेखील वाचा – PAK vs AUS : पाकिस्तान ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होणार निर्णायक लढत! कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह स्ट्रीमिंग?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या T20 वर हवामानाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. सामन्यादरम्यान पावसाचीही शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण वेळ आकाश ढगाळ राहील असे सांगण्यात आले आहे आणि जोरदार वारेही वाहत राहतील. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळणे स्वाभाविक आहे. हे लक्षात घेऊन दोन्ही संघ प्लेइंग इलेव्हन निवडू शकतात. आजच्या सामन्यात सूर्यकुमार कोणत्या खेळाडूंना संधी देणार आणि टीम इंडियाची प्लेइंग ११ कशी असेल यावर एकदा नजर टाका.
डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची वाट पाहत आहे. याआधी त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली होती, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतही तो टीम इंडियाचा एक भाग आहे. अशा स्थितीत खेळपट्टी आणि हवामान पाहता तो आज पदार्पण करू शकतो, असे बोलले जात आहे. यश दयालला संधी मिळाल्यास लेगस्पिनर रवी बिश्नोईला वगळले जाऊ शकते. याशिवाय संघात कोणतेही बदल अपेक्षित नाहीत. मागील सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा संघासाठी मोठी कामगिरी करु शकला नाही त्यामुळे त्याच्या कामगिरीवर आज प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत.
हेदेखील वाचा – चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का; BCCI ने ICC सांगितला अंतिम निर्णय
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई/यश दयाल, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंह.