
India vs South Africa LIVE Score: India's innings collapses at 211 runs! Pant Army collapses in front of Jansen; South Africa leads by 288 runs
हेही वाचा : IND VS SA : यशस्वी जयस्वालचा WTC मध्ये महापराक्रम! ‘हा’ विक्रम करत जागतिक क्रिकेटमध्ये रचला इतिहास
दक्षिण आफ्रिकेच्या ४८९ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाला २०१ धावापर्यंतच मजल मारता आली. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर वगळता कुणाला टिकाव धरता आलेला नाही. भारताच्या पहिल्या डावाची सुरवात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहूल यांनी केली. या दोन सलामीवीरांनी ६५ धावा जोडल्या. त्यानंतर केएल राहुल २२ धावा काढून माघारी गेला.त्याला केशव महाराजने बाद केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना धावाच काढू दिल्या नाहीत. जयस्वालही आपले अर्धशतक पूर्ण करून बाद झाला. त्याने ९७ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याला हार्मरमने आपली शिकार बनवले.
राहुलनंतर आलेला साई सुदर्शन १५ धावा करून बाद झाला. त्याला सायमन हार्मरमने माघारी पाठवले.वॉशिंग्टन सुंदरने ९२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. त्याला सायमन हार्मरने बाद केले. ध्रुव जुरेल ० धावा, ऋषभ पंत ७ धावा, रवींद्र जडेजा ६ धावा, नितीश कुमार रेड्डी १० धावा, कुलदीप यादव १९ धावा, जसप्रीत बुमराह ५ धावा करून बाद झाले तर मोहम्मद सिराज २ धावा करून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जानसेनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या तर सायमन हार्मरने ३ विकेट्स घेतल्या. तर केशव महाराजने १ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : ZM VS PAK : सलमान अली आघाने मोडला राहुल द्रविडचा विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा जगातील ठरला पहिला खेळाडू
दक्षिण आफ्रिका संघ
एडेन मार्कराम, रायन रिकेलटन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरी (यष्टिरक्षाक), मार्को जानसेन, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर आणि केशव महाराज.
भारतीय संघ
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.