सलमान अली आघा आणि राहुल द्रविड(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : T20 World Cup 2025 चे वेळापत्रक या दिनी होणार जाहीर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह स्ट्रिमिंग
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुरू असलेल्या टी-२० त्रिकोणी मालिकेतील चौथा सामना रविवारी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना सलमान अली आघाचा वर्षातील ५४ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. यापूर्वी, राहुल द्रविडने एका वर्षात सर्वाधिक सामने खेळणीयकी किमया साधली आहे. त्याने १९९९ मध्ये ५३ सामने खेळण्याचीकामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफने २००० मध्ये ५३ सामने खेळले होते तर महेंद्रसिंग धोनीने २००७ मध्ये ५३ सामने खेळेले होते.
सलमान अली आघाने या वर्षी आतापर्यंत ३२ टी-२० सामने खेळले आहेत, त्यासोबत त्याने १७ एकदिवसीय आणि पाच कसोटी सामने खेळले आहेत. सलमान अली आघा यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने आशिया कप फायनलमध्ये भारताकडून पराभव स्वीकारायला होता.
रविवारी रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सलमान अली आघा यांनी त्यांच्या संघात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आघा फक्त दोन चेंडूत १ धाव काढल्यानंतर नाबाद राहिला आणि फखर जमानसोबत सहाव्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी रचली. फखर जमानने १० चेंडूत २७ धावा काढल्यानंतर नाबाद राहिला.
हेही वाचा : IPL 2026 : IPL हंगामाधीच RCB आणि RR मध्ये जोरदार स्पर्धा! PUNE होम ग्राउंड बनवण्यासाठी MCA कडे आग्रह
पाकिस्तानच्या डावात, बाबर आझमने ५२ चेंडूत ७४ धावा केल्या तर साहिबजादा फरहानने ४१ चेंडूत ६३ धावा फटकावल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची मजबूत भागीदारी रचली. ज्यामुळे संघ १९५/५ च्या सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला. झिम्बाब्वेचा संघ १२६ धावांवर गारद झाला. पाकिस्तानने हा सामना ६९ धावांनी आपल्या खिशात टाकला आणि टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दिमाखात एंट्री केली.






