
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारताच्या संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला, या दौऱ्यात भारताच्या संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर त्यानंतर पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. यामधील झालेल्या तीन सामन्यात भारताच्या संघाने दोन सामने जिंकले आणि एक सामन्यात पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकल्यानंतर, भारतीय संघ लवकरच आपल्या पुढील मोहिमेवर जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे भारताने मालिका जिंकली. आता टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे, त्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी मालिका ( India vs South africa Test Series ) सुरू होणार आहे, पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे खेळला जाणार आहे. तर, भारत आणि दक्षिण आफ्रिका त्यांचे सामने कधी खेळतील ते जाणून घेऊया.
टीम इंडियासाठी वाईट बातमी, सामना जिंकवणारा खेळाडू 4 महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर, झाला गंभीर जखमी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – १४ ते १८ नोव्हेंबर – कोलकाता
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २२ ते २६ नोव्हेंबर – गुवाहाटी
पहिला सामना: ३० नोव्हेंबर, रांची
दुसरा सामना – ३ डिसेंबर, रायपूर
तिसरा सामना – ६ डिसेंबर, विशाखापट्टणम
🚨 Test Squad for South Africa Test Series 🚨@ShubmanGill eyes back-to-back series wins at home, while @RishabhPant17 marks his much-awaited comeback to the India squad after injury! 🇮🇳🔥#INDvSA 👉 1st Test, FRI, 14th NOV, 8.30 AM on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/JcId9kgClR — Star Sports (@StarSportsIndia) November 5, 2025
पहिला सामना: ९ डिसेंबर, कटक
दुसरा सामना – ११ डिसेंबर, न्यू चंदीगड
तिसरा सामना – १४ डिसेंबर, धर्मशाला
चौथा सामना – १७ डिसेंबर, लखनौ
पाचवा सामना – १९ डिसेंबर, अहमदाबाद
चाहते जिओ हॉटस्टार अॅपवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचा सामना लाईव्ह पाहू शकतात.
भारताचा कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत ( यष्टीरक्षक ), यशस्वी जैस्वाल , केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल , ध्रुव जुरेल , रवींद्र जडेजा , वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह , अक्षर पटेल, नितीश कुमार , मोहम्मद अकुंल रेड्डी , दीप राजकुमार , दीपराज, साई सुदर्शन.