फोटो सौजन्य - सोशल मिडिया
इंडिया अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळत आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे पण शेवटच्या डावामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने देखील कामगिरी केली आहे. सध्या ते फलंदाजी करत आहेत. इंडिया अ मध्ये भारताचा उपकर्णधार रिषभ पंत याला दुखापत झाली होती पण त्यानंतर तो फलंदाजीला आला होता आता तो ठिक आहे पण आता आणखी एक खेळाडूं संदर्भात माहिती समोर आली आहे.
इंडिया अ संघाकडून अपवादात्मक कामगिरी केल्यानंतर एका भारतीय खेळाडूने मुख्य संघात पुनरागमनासाठी जोरदार दावा केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता होती, परंतु निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली नाही. आता, एक मोठी अपडेट समोर आली आहे, भारताकडून खेळताना या खेळाडूला दुखापत झाली, ज्यामुळे तो सुमारे चार महिने खेळू शकला नाही. या बातमीमुळे सध्याच्या आयपीएल चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
भारत अ संघ दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध चार दिवसांचा कसोटी सामना खेळत होता. आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याला गंभीर दुखापत झाली. दैनिक जागरणमधील वृत्तानुसार, पाटीदार सुमारे चार महिने खेळू शकणार नाही. पाटीदारने पहिल्या डावात १९ आणि दुसऱ्या डावात २८ धावा केल्या. या दुखापतीमुळे पाटीदार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. सातत्यपूर्ण कामगिरीने पाटीदारने पुनरागमनासाठी आपला दावा मजबूत केला होता. तो आता संपूर्ण देशांतर्गत हंगामासाठी बाहेर आहे.
🚨 RAJAT PATIDAR OUT OF CRICKET FOR 4 MONTHS 🚨 – Rajat Patidar will be out of Cricket action for 4 months due to injury. (Abhishek Tripathi). pic.twitter.com/kWBKUq700o — Tanuj (@ImTanujSingh) November 8, 2025
२०२५-२६ च्या रणजी ट्रॉफीमधील पहिल्याच सामन्यात रजत पाटीदारने मध्य प्रदेशकडून द्विशतक झळकावले. पाटीदारने यापूर्वी दुलीप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि इंडिया अ संघासाठी फलंदाजीतून कामगिरी केली आहे. आयपीएल विजेता कर्णधार म्हणून, पाटीदारची प्रतिष्ठा आधीच उंचावली आहे. तथापि, आरसीबीला आशा आहे की मार्चपूर्वी पाटीदार पूर्णपणे तंदुरुस्त होईल. गेल्या हंगामात, रजत दुखापतीमुळे काही आयपीएल सामनेही गमावले होते, त्या काळात जितेश शर्माने आरसीबीचे नेतृत्व केले होते.






