
India vs bangladesh Asia cup 2026
IND vs PAK: 55 वर ऑल आउट तोरा तर…! बाद करून दाखवला माज! फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई
भारतीय महिला क्रिकेट संघाची इतर आशियाई संघांविरुद्ध चांगली कामगिरी आहे.भारतीय संघाने बांग्लादेशविरुद्ध एकूण २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्यापैकी २१ सामने जिंकले आहेत आणि केवळ तीन गमावले आहेत. भारतीय महिला संघाला बांग्लादेशविरुद्ध २०२३ मध्ये शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून, दोन्ही संघांमध्ये एकूण ८ सामने खेळले गेले आहेत आणि टीम इंडियाने ते सर्व सामने जिंकले आहेत.
टी२० आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ आणि बांग्लादेश संघ यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने तीन आणि बांग्लादेशने दोन सामने जिंकले आहेत. २०२४ मध्ये झालेल्या शेवटच्या महिला टी२० आशिया कपमध्ये हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही आमनेसामने आले होते, ज्यात भारताने १० विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता.
बांग्लादेश आणि युएई यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकांत ७ विकेट्स गमावून केवळ १०३ धावा केल्या. बांगलादेशने यूएईसमोर १०४ धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु, युएईची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. युएईने २० षटकांत ९ विकेट्स गमावून केवळ ६९ धावा केल्या. बांग्लादेशने हा सामना जिंकून थेट उपांत्य फेरीचे स्थान गाठले. ‘गट ब’च्या गुणतालिकेत बांग्लादेश आणि युएई २-२ अशा बरोबरीत होते. विजेता संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला असता. या विजयामुळे बांग्लादेशने भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना १० सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल. त्याआधी दोन्ही संघांचे कर्णधार सायंकाळी ७:३० वाजता नाणेफेकीसाठी मैदानावर येतील. तुम्ही हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर हा सामना थेट पाहू शकतात. ऑनलाइन, हा सामना सोनी लिव्ह ॲप किंवा वेबसाइटवर पाहू शकता.
IND vs PAK: आशिया कपमध्ये पुन्हा ‘महामुकाबला’! भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? पाहा संपूर्ण समीकरण