फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष हे आजच्या सामन्याकडे लागले आहे. आजच्या सामना हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा असणार आहे. क्रिकेटप्रमींकडून भरतोय महिला संघाकडून खूप अपेक्षा आहेत. नुकतेच ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यामुळेच आता भारतीय संघातील गोलंदाजांना उत्तम गोलंदाजी करणे महत्वाचे ठरणार आहे. भारतासाठी ही मॅच करो या मरो अशी असणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय महिला संघाने महिला टी20 विश्वचषकात उत्तम कामगिरी केली आहे. सुरवातीला त्यांना न्यूझीलंडविरुद्ध हार पत्कारावी लागली. परंतु त्यानंतर सलग दोन सामने जिंकून फक्त भारतीय संघाचीच नाही तर समस्त देशवासीयांच्या आत्मविश्वास बळावला आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामान खेळणे भारताला सोपे जाणार नाही आहे.
हे देखील वाचा: PAK vs ENG : बाबर आझमला काढलं संघाबाहेर! इंग्लंड कसोटी मालिकेतून पीसीबीने वगळलं
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय गोलंदाज कसे गोलंदाजी करतील हे पाहणं नक्कीच महत्वाचे ठरणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिली दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळणार नसून तिच्या जागी ताहिला मॅकग्रा संघाचे नेतृत्व करत आहे.
भारत: हरमनप्रीत कौर (कॅप्टन) शफाली वर्मा, स्मृति मानधना, जेमिमा रोड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, श्रेयंका पाटिल, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
ऑस्ट्रेलिया: ताहिला मॅकग्रा (कर्णधार), बेथ मूनी (यष्टीरक्षक), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वेरेहम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.