Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष्य सेनची झुंज अपुरी! माजी वर्ल्ड चॅम्पियनकडून पराभव, Asian Games 2026 मधील आव्हान संपुष्टात

Asian Games 2026: जपानमधील ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 मध्ये भारताला धक्का बसला आहे. लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात आले आहे. सिंगापूरच्या माजी जागतिक विजेत्या लोह कीन यू याने लक्ष्य सेनचा पराभव केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2026 | 09:31 PM
एशियन गेम्स 2026

एशियन गेम्स 2026

Follow Us
Follow Us:
  • बॅडमिंटन प्रकारात लक्ष्य सेन एशियन गेम्समधून बाहेर
  • जपानच्या ऐची-नागोया येथे सुरू आहे एशियन गेम्स
  • लक्ष्य सेन याचे पुरुष एकेरीतील आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात
India Asian Games 2026: जपानमध्ये सध्या एशियन गेम्स 2026 ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी 27 पेक्षा जास्त पदके जिंकली आहेत. त्यामध्ये 4 सुवर्ण पदकांचा देखील समावेश आहे. मात्र एशियन गेम्समधून भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याचे पुरुष एकेरीतील आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले आहे. सिंगापूरच्या माजी जागतिक विजेत्या लोह कीन यू याने लक्ष्य सेनचा तीन सेटच्या अटीतटीच्या सामन्यात पराभव केला.

जपानमधील ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 मध्ये भारताला धक्का बसला आहे. लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात आले आहे. सिंगापूरच्या माजी जागतिक विजेत्या लोह कीन यू याने लक्ष्य सेनचा पराभव केला आहे. पुरुष एकेरीच्या या महत्त्वाच्या सामन्यात सिंगापूरच्या लोह कीन यू याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली होती.

Asian Games : हा तर, चक्क वेडेपणा, एशियन गेम्समधील ‘या’ गोष्टींवर वैतागला एच. एस. प्रणॉय

लोह कीन यू याने त्याच्या खेळावर आधीपासूनच नियंत्रण राखले होते. त्यामुळे लोह कीन यू याने उत्तम नियंत्रण आणि वेगवान शॉट्सच्या जोरावर पहिला सेट १२-२१ असा सहज खिशात घातला.  दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्य सेनने जोरदार कमबॅक केले. आपल्या कौशल्याचा वापर करत त्याने हा सेट २१-१५ असा जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. मात्र त्याला ही आघाडी त्याला राखता आली नाही.

शेवटच्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. मात्र, मोक्याच्या क्षणी सिंगापूरच्या खेळाडूने केलेल्या आक्रमक खेळापुढे लक्ष्यचा निभाव लागला नाही आणि त्याला हा सेट १४-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. हा सामना १२-२१, २१-१५, १४-२१ असा गमवावा लागल्यामुळे लक्ष्य सेनचे वैयक्तिक एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. या पराभवामुळे तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला  आहे.

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित

जपानच्या ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला आहे. ई-स्पोर्ट्स, पुरुष टेबल टेनिस, कॅनो स्प्रिंट आणि पुरुष सेबर (तलवारबाजी) या महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.

Web Title: Indian badminton player lakshya sen eliminated mens singles asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Badminton
  • lakshya sen

संबंधित बातम्या

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित
1

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’
2

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’

Asian Games 2026: ४८ सेकंदांनी गोल्ड हुकलं, पण ४४ वर्षांचा दुष्काळ संपला! सावन बारवालचा ऐतिहासिक मेडल रन; भारताला मॅरेथॉनमध्ये पदक
3

Asian Games 2026: ४८ सेकंदांनी गोल्ड हुकलं, पण ४४ वर्षांचा दुष्काळ संपला! सावन बारवालचा ऐतिहासिक मेडल रन; भारताला मॅरेथॉनमध्ये पदक

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई
4

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.