Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित, सौजन्य : आयएएनएस
भारताचा स्क्वॉश खेळाडू अभय सिंहने शनिवारी पाकिस्तानच्या मुहम्मद इरफानचा 3-0 असा दणदणीत (11-3, 12-10, 11-6) पराभव करत एशियन गेम्स २०२६ (Asian Games)च्या पुरुष सिंगल्स स्क्वॉश फायनलमध्ये जागा मिळवली.
दुसरीकडे अनाहतने देखील महिलांच्या एकेरी स्क्वॉशची फायनल गाठली आहे. येथपर्यंत पोहचणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. अभय व अनाहत दोघेही सुवर्ण पदक जिंकत थेट लॉस अँजिल्स ऑलिम्पिक 2028 मध्ये थेट पात्र होण्याच्या दारापर्यंत पोहचले आहेत.
जागतिक 26 व्या क्रमांकाचा खेळाडू अभय सिंह हा सौरव घोषालनंतर एशियन गेम्सच्या पुरुष एकेरीत फायनलमध्ये पोहचणारा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू बनला आहे. सौरव घोषालने 2014 आणि 2023 मध्ये रौप्य पदक पटकावले होते.
अभयने इरफानविरुद्ध पहिला सेट 11-3 असा जिंकत या शानदार विजयाचा पाया रचला. इरफानने शुक्रवारी क्वॉर्टर फायनलमध्ये भारताच्या वीर छोटरानीचा पराभव केला होता. त्याचा वचपा अभयने काढला. दुसऱ्या सेटमध्ये पाकच्या खेळाडूने थोड्या वेळेसाठी पुनरागमन केले व स्कोर 10-10 असा नेला, पण अभयने संयम दाखवत 12-10 असा सेट आपल्या नावे करत आपली आघाडी 2-0 ने वाढवली.
तिसरा सेटही पहिल्या सेटसारखाच राहिला. अभयने सुरुवातीलाच चार मॅच प्वॉईंट आपल्या नावे केले. त्याने इरफानला पुनरागमनाची कोणतीच संधी न देता थेट अंतिम सामन्यात धडक मारली. आता अंतिम सामन्यात त्याचा सामना एखाद्यावेळेस पाकिस्तानी खेळाडूशीच होऊ शकते. कारण नूर जमानचा सामना शनिवारी संध्याकाळी मलेशियाच्या ईन योव एनजीशी होणार आहे.
याअगोदर अनाहस सिंहने जपानच्या जागतिक सहाव्या क्रमांकावरील खेळाडू सतोमी वातानाबे 3-2 (9-11, 11-13, 12-10, 11-6, 11-3)चा पराभव करत शानदार पुनरागमन केले व महिला एकेरीच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केली.
सुरुवातीचे दोन गेम 9-11 आणि 11-13 असे गमावल्यानंतर 18 वर्षीय भारतीय खेळाडूने तिसऱ्या गेममध्ये जबरदस्त पुनरागमन केले. एक वेळ ती 8-10 अशी पिछाडीवर होता, पण तिने गेम प्वॉइंट्स वाचवताना 12-10 असा विजय प्राप्त केला.
आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई






