
12 जूनपासून सुरू होणार आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा
हरमनप्रीत कौर करणार भारताचे नेतृत्व
19 रन्स करताच हरमन प्रीत कौर करणार नवा रेकॉर्ड
ICC Womens T20 World Cup 2026: लवकरच महिला विश्वचषक 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. 12 जूनपासून वर्ल्ड कप सुरू होत आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान 14 जून ला भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. या स्पर्धेत कौरकडे एक नवा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.
भारतीय संघ यंदा वर्ल्ड जिंकण्याच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत टी 20 वर्ल्ड कप जिंकेल अशी सर्वांना विश्वास आहे. हरमनप्रीत कौर प्रत्येक टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचा भाग राहिली आहे. या स्पर्धेत तिच्याकडे एक नवा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.
महिला वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या मेग लैनाच्या नावावर आहे. तिने 30 सामने खेळून 854 रन्स केल्या आहेत. हा रेकॉर्ड मोडण्याची संधी हरमनप्रीत कौरकडे असणार आहे. हरमनप्रीत कौर चौथ्या स्थानावर आहे. तिने 19 सामन्यांमध्ये 481 रन्स केल्या आहेत. हरमन प्रीत कौरने 19 रन्स करताच एक नवा रेकॉर्ड रचणार आहे. 19 रन्स करताच वर्ल्ड कपमध्ये 500 किंवा त्यापेक्षा सर्वाधिक रन्स करणारी चौथी भारतीय महिला बनणार आहे.
Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य
Team India सेमीफायनलमध्ये जाणार?
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड कप मधला पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार आणि दिग्गज समालोचक नासिर हुसैन यांनी या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये कोणते सणघ जाऊ शकतात त्याबाबत भाष्य केले आहे.
IND W vs ENG W: निर्णायक युद्ध! हरमनप्रीतची ‘अग्निपरीक्षा’; ‘इथे’ दिसणार Live Match
नासिर हुसैन यांना सेमीफायनलमध्ये कोणते संघ जाऊ शकतील याबाबत भाष्य केले आहे. तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इनागलंड या दोन बलाढ्य संघांची नावे घेतली आहेत. होम ग्राऊंडवर सामने असल्याने इंग्लंडला फायदा मिळू शकतो. तर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रबळ दावेदार असू शकतो. उर्वरित दोन संघाबद्दल बोलायचे झाल्यास नासिर हुसेन यांनी वेस्ट इंडिजचे नाव घेतले आहे. वेस्ट इंडिजचा संघ आपल्या कामगिरीने सर्वांना नक्की