महिला विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये जाणार? (फोटो- सोशल मीडिया)
12 जूनपासून होणार आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा
हरमनप्रीत कौर करणार भारताचे नेतृत्व
14 जून रोजी भारत पाकिस्तान महामुकाबला
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक Semifinal Predict: आयपीएलचा थरार नुकताच संपला आहे. आता 12 जूनपासून आयसीसी महिला टी -20 विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत आपला पहिला सामना 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान आज आपण कोणते संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात याबाबत जाणून घेऊयात.
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड कप मधला पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार आणि दिग्गज समालोचक नासिर हुसैन यांनी या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये कोणते सणघ जाऊ शकतात त्याबाबत भाष्य केले आहे.
नासिर हुसैन यांना सेमीफायनलमध्ये कोणते संघ जाऊ शकतील याबाबत भाष्य केले आहे. तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इनागलंड या दोन बलाढ्य संघांची नावे घेतली आहेत. होम ग्राऊंडवर सामने असल्याने इंग्लंडला फायदा मिळू शकतो. तर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रबळ दावेदार असू शकतो. उर्वरित दोन संघाबद्दल बोलायचे झाल्यास नासिर हुसेन यांनी वेस्ट इंडिजचे नाव घेतले आहे. वेस्ट इंडिजचा संघ आपल्या कामगिरीने सर्वांना नक्कीच चौकावू शकतो असे ते म्हणाले. मात्र सध्या 3 ऱ्या स्थानासाठी विद्यमान चॅम्पियन न्यूझीलंडच्या संघाला पसंती देईन.
चौथ्या स्थानासाठी हुसैन यांच्यासमोर भारत आणि दक्षिण आफ्रिका असे दोन पर्याय होते. यामध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेऐवजी भारतीय संघाला प्राधान्य दिले आहे. भारतीय संघ मोठ्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये आणि महत्त्वाच्या प्रसंगी आपला खेळ अधिक उंचावतो आणि सर्वोत्तम कामगिरी करतो, असे हुसेन म्हणाले.






