फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
ICC rankings of Indian bowlers : इंडियन प्रीमियर लीग भारतात आयोजित केली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएल २०२५ मध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत हाय स्कोरिंग सामने त्यामुळे भारतीय खेळपट्टीवर फार काही गोलंदाजांचे चालताना दिसत नाही. या सीझनमध्ये दुसऱ्याच सामन्यात हैदराबादच्या संघाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात २८६ धावा २० षटकांमध्ये केल्या होत्या. या १८ व्या सीझनमध्ये या सर्वाधिक धावा आहेत.
आयपीएल दरम्यान, आयसीसीने २६ मार्च रोजी नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांना टी-२० क्रमवारीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफीला खूप फायदा झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत डफीने शानदार कामगिरी केली होती. ३० वर्षीय गोलंदाजाने १३ विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याला आयसीसीकडून बक्षीस मिळाले आहे.
आयसीसी टी-२० गोलंदाजी क्रमवारीत दोन भारतीय गोलंदाजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताचा मिस्त्री स्पिनर वरून चक्रवर्ती दुसऱ्या स्थानावर आहे. रवी बिश्नोई सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे. त्याला १ स्थान मिळाले आहे. तर अर्शदीप सिंग यांनाही एक स्थान गमवावे लागले आहे. तो नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. अर्शदीप टॉप १० मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. तथापि, न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफीने ७ स्थानांची प्रगती केली आहे. तो ६९४ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
Gains aplenty for performers from the New Zealand-Pakistan series in the rankings update 🏏https://t.co/fWAT9aMXGk
— ICC (@ICC) March 26, 2025
कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा १० व्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे. आयसीसी टी-२० गोलंदाजी क्रमवारीत, अकील होसेन ७०७ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर वरुण चक्रवर्ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे ७०६ रेटिंग गुण आहेत. आदिल रशीद ७०५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा ७०० रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. अॅडम झांपा आणि जेकब डफी ६९४-६९४ गुणांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह हा अव्वल स्थानावर आहे तर हार्दिक पंड्याने त्याचे अव्वल स्थान गाठून ठेवले आहे. हार्दिक पंड्याने भारतीय संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे तर जसप्रीत बुमराह मागील काही महिन्यांपासून जखमी असल्यामुळे विश्रांती घेत आहे.