फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आज आमनेसामने असणार आहेत. या सामन्यांमध्ये दोन्ही संघाची १८ व्या सिझनची सुरुवात पराभवाने झाली आहे. कोलकाताचा संघ मागील वर्षाचा आयपीएल विजेता संघ आहे पण त्यांची या नव्या सिझनची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. आज दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहेत. कोलकाता नाईट राइडर्सचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळेल तर राजस्थान रॉयल्सचा संघ रियान परागच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या सामन्याला सुरुवात झाली आहे या सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss 🚨@KKRiders elected to bowl first against @rajasthanroyals in Guwahati
Updates ▶ https://t.co/lGpYvw87IR #TATAIPL | #RRvKKR pic.twitter.com/PVVVJoU2cz
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
पण टॉस दरम्यान, जेव्हा रहाणेला केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारण्यात आले तेव्हा रहाणेने सांगितले की सुनील नारायण या सामन्यात खेळत नाहीये. तो तंदुरुस्त नाही. त्याच्या जागी मोईन अलीला संधी देण्यात आली आहे. तो पहिल्यांदाच केकेआरकडून खेळणार आहे. आजच्या सामन्यावर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे, अजिंक्य रहाणेने मागील सामन्यांमध्ये कमालीची फलंदाजी केली होती त्यामुळे आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. तर संजू सॅमसनने मागील सामन्यांमध्ये इम्पॅट प्लेयरची दमदार भूमिका निभावली होती.
नाणेफेकनंतर कॅप्टन अजिंक्य रहाणे म्हणाला की आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. विकेट खरोखरच चांगली दिसतेय. जर आपण प्रथम गोलंदाजी केली तर आपल्याला विकेट कशी असेल याची कल्पना येईल. येथे दव घटक खूप मोठा आहे. आम्ही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. गेल्या सामन्यातून आम्ही खूप काही शिकलो आहोत. आपल्याला वर्तमानात राहायचे आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने टीममध्ये वानिंदू हसरंगा स्थान दिले आहे.
रियान पराग (कर्णधार), संजू सॅमसन, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, महिष तीक्षना, वानिंदू हसरंगा
अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, मोईन अली, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन