
Asia Cup 2025 Team India Schedule: जवळपास महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने (BCCI) आशिया कप 2025 साठी (Aisa Cup 2025) भारतीय संघाची घोषणा (Team India Squad) केली असुन यात नवीन मोठे बदल पाहायला मिळाले आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघाचे नेतृत्व करणार असून, शुभमन गिल (Shubman Gill) उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल. सध्या सर्वात जास्त चर्चा भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याची होत असली तरी, भारतीय संघ साखळी फेरीमध्ये आणखी दोन संघांशी भिडणार आहे. तुम्हाला या सर्व सामन्यांची तारीख आणि वेळ माहित असणे आवश्यक आहे.
आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला १४ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा दिवस रविवार असल्याने क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. पूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीला ‘महामुकाबला’ म्हटले जायचे, पण आता ही केवळ एक परंपरा बनली आहे. आजकाल पाकिस्तानचा संघ भारताच्या तुलनेत खूपच कमकुवत झाला आहे. त्यामुळे हा सामना एकतर्फी होतो. असे असले तरी, आजही या सामन्याला क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना मानले जाते.
आशिया चषकाची सुरुवात ९ सप्टेंबरपासून होईल, पण भारतीय संघ आपले पहिले सामने १० सप्टेंबरपासून खेळेल.
या वर्षी आशिया चषकात एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक गटात चार-चार संघांचा समावेश आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू राकेसिंग, संजू राकेश (विकेटकीपर).