फोटो सौजन्य - ANI
गौतम गंभीर : १५ ऑगस्ट रोजी देशामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज संपूर्ण देश भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. देशातील आज सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठ्या सेलिब्रेटींपर्यत सगळेच आज स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. आज भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सुद्धा त्यांच्या परिवारासोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय क्रिकेट संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक, गौतम गंभीर यांनी हा खास दिवस आपल्या कुटुंबासह मोठ्या थाटामाटात साजरा केला.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे काही स्वातंत्र्य दिनाचे फोटो सोशल मीडियावर ANI ने शेअर केले आहेत. यामध्ये गौतम गंभीरने आपली देशभक्ती अनोख्या पद्धतीने दाखवली, ज्याची झलक त्याच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये गंभीर त्याची पत्नी नताशा जैन आणि दोन्ही मुली तसेच घरातील कर्मचाऱ्यांसह तिरंग्यासमोर अभिमानाने उभा असल्याचे दिसत आहे. चित्रात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणि अभिमानाची भावना स्पष्टपणे दिसत आहे. या चित्रांमुळे देशभक्तीची भावना आणखी दृढ झाली आहे, जी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व दर्शवते.
Delhi | Head Coach of the Indian Cricket Team, Gautam Gambhir hoisted the Tricolour at his residence, as part of ‘Har Ghar Tiranga’ ahead of Independence Day.
(Source: Gautam Gambhir’s Office) pic.twitter.com/CQivyY1qMP
— ANI (@ANI) August 14, 2024
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या निवृत्तीनंतर गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षणापदी निवड करण्यात आली आहे. गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये भारताच्या क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध १ T२० मालिका जिंकली आहे तर एक एकदिवसीय मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.