Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित? 

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर, गौतम गंभीरच्या रेड-बॉल प्रशिक्षकपदाच्या पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहे. अशातच आता त्याच्या जागी दूसरा कसोटी प्रशिक्षक नेमण्यात येण्याचे बोलले जात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 27, 2025 | 08:18 PM
Gautam Gambhir's position as head coach is under threat! Has the BCCI finalized the name of this experienced player?

Gautam Gambhir's position as head coach is under threat! Has the BCCI finalized the name of this experienced player?

Follow Us
Close
Follow Us:

Gautam Gambhir’s future as head coach is in jeopardy : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला संपटून मार खावा लागला आणि भारताने मालिका ०-२ अशी गमावली. त्यानंतर भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापनावर टीका झाली होती. त्यानंतर भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आपल्या खिशात टाकली. तथापि, आफ्रिकन संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर, गौतम गंभीरच्या रेड-बॉल प्रशिक्षकपदाच्या पदाबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे. आता, एका अहवालामध्ये एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका अधिकाऱ्याने व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधण्यात आला असून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हेही वाचा : Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर

व्हीव्हीएस लक्ष्मणशी साधला संपर्क

भारताच्या पांढऱ्या चेंडूच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीरचा रेकॉर्ड प्रभावी राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एसीसी ट्रॉफी देखील जिंकली आहे. तथापि, कसोटीतील त्यांचा रेकॉर्ड मात्र निराशाजनक राहिला आहे. मागील महिन्यात घरच्या मैदानावर झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेने चांगलेच लोळवले. त्यानंतर क्रिकेट बोर्डातील एका प्रभावशाली खेळाडूने पुन्हा एकदा अनौपचारिकरित्या व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधून त्याला रेड-बॉल संघाचे प्रशिक्षकपदी येण्याची इच्छा आहे का याबाबत जाणून घेतले.

तथापि, या महान फलंदा व्ही व्ही लक्ष्मणकडून बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे “क्रिकेट प्रमुख” म्हणून राहिल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे. गौतम गंभीरचा बीसीसीआयसोबतचा करार २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अखेरीपर्यंत असणार आहे. पाच आठवड्यांनी सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकातील भारताच्या कामगिरीच्या आधारे यावर पुनर्विचार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कसोटी प्रशिक्षक म्हणून गंभीरची कारकीर्द धोक्यात

बीसीसीआयच्या वर्तुळात, २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील बाकी असणाऱ्या नऊ कसोटी सामन्यांसाठी रेड-बॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून गंभीर योग्य व्यक्ती आहे का याबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर, भारताचे काही परदेश दौरे देखील असणार आहेत, ज्यामध्ये ऑगस्ट २०२६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी आणि ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका यांचा समावेश आहे. त्यानंतर भारत २०२७ मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषावणार आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राकडून नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगण्यात आले आहे की, “गंभीरला भारतीय क्रिकेटच्या शक्तीशाली वर्तुळामध्ये जोरदार पाठिंबा असून जर भारताने टी-२० विश्वचषक कायम ठेवला किंवा किमान अंतिम फेरी गाठली तर तो अखंडपणे त्याची भूमिका बजावत राहणार आहे. तथापि, गंभीर कसोटी क्रिकेटमध्येही कायम राहिला तर ते मनोरंजक ठरणार आहे.” सूत्राने पुढे असे देखील म्हटले आहे की, “त्याचा फायदा असा आहे की रेड-बॉल फॉरमॅटमध्ये फारसे पर्याय उपलब्ध नाहीत, कारण व्हीव्हीएस लक्ष्मणला वरिष्ठ कसोटी संघाचे प्रशिक्षकपद देण्यात रस नाही.”

हेही वाचा : ‘RO-KO’ साठी 2025 वर्ष ठरले शानदार! भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका; ICC रँकिंगमध्ये साधली हॅटट्रिक

Web Title: Gautam gambhirs position as head coach of the test team is in jeopardy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • VVS Laxman

संबंधित बातम्या

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार
1

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली
2

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!
3

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!

T20 World Cup 2026 : ‘शुभमन उत्तम खेळाडू, मात्र तो…’ गिलला डच्चू दिल्यानंतर निवडकर्त्या आगरकरांचे विधान चर्चेत 
4

T20 World Cup 2026 : ‘शुभमन उत्तम खेळाडू, मात्र तो…’ गिलला डच्चू दिल्यानंतर निवडकर्त्या आगरकरांचे विधान चर्चेत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.