
INDU19 vs BANU19: Vaibhav Suryavanshi shines in the World Cup! Breaks Virat Kohli's record in youth ODI matches.
Vaibhav Suryavanshi broke Kohli’s record : आज झिम्बाब्वे येथे खेळवण्यात येत असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारत आणि बांगलादेश आमनेसामने आले आहेत. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर भारताने प्रथम फलंदाजी करत वैभव सूर्यवंशीच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ बाद १९७ धावा करून बांगलादेशसमोर १९८ धावांचे आव्हान दिले आहे. परंतु, पावसाच्या व्यत्ययामुळे सामाना थांबलेला आहे. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने एक मोठी कामगिरी केली आहे.
हेही वाचा : रणजी ट्रॉफी 2025-026 च्या दुसऱ्या फेरीपूर्वी मुंबईला झटका! ‘या’ स्टार फलंदाजाची स्पर्धेतून माघार
भारताच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी या खेळाडूने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. वैभव सूर्यवंशीने आता १९ वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून पुढे आला आहे. या कामगिरीने त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहलीने २८ सामन्यात १९ वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ९७८ धावा फटकावल्या आहेत. तर वैभव सुरवंशीने आता या बाबतीत विराट कोहलीला पिछाडीवर सोडले आहे.
भारताच्या १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विजय झोलच्या नावावर जमा आहे. त्याने ३६ सामन्यांमध्ये १,४०४ धावा काढल्या आहेत. या यादीमध्ये यशस्वी जयस्वाल दुसऱ्या स्थानी आहे. जयस्वालने २७ सामन्यांमध्ये १,३८६ धावा केल्या आहेत. तसेच तन्मय श्रीवास्तव ३४ सामन्यांमध्ये १,३१६ धावा करून तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. उन्मुक्त चंदने २१ सामन्यांमध्ये १,१४९ धावा फटकावल्या आहेत. तर एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलने १६ सामन्यांमध्ये १,१४९ धावा केल्या आहेत. तसेच सरफराज खानने ३३ सामन्यांमध्ये १,०८० धावा फटकावल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या वैभवने भारतीय संघ संकटात असताना ६७ चेंडूत ७२ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ३ षटकार लागवले. तर अभिमन्यु कुंडूने १०३ चेंडूत ६९ धावा केल्या आहेत.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कि, वैभव सूर्यवंशीने १४ वर्षे आणि २९४ दिवस वयाच्या १९ वर्षाखालील विश्वचषकात पदार्पण केले आहे. वैभव सूर्यवंशी १५ वर्षांचा होण्यापूर्वी विश्वचषक सामना खेळणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, १९ वर्षाखालील जागतिक स्पर्धेत पदार्पण करणारा सर्वात तरुण भारतीय कुमार कुशाग्र याचे नाव आघाडीवर होते. ज्याने २०२० मध्ये १५ वर्षे आणि ८८ दिवसांचा असताना श्रीलंकेविरुद्ध सामना खेळला होता.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशची मुजोरी कायम! भारतीय आयसीसी अधिकाऱ्याला नाकारला व्हिसा