Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL Auction: रिकाम्या 204 जागांसाठी जगभरातून 1574 खेळाडूंचे रजिस्ट्रेशन, वाचा संपूर्ण यादी

IPL Auction 2025: आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. खेळाडूंची संपूर्ण यादी तुम्ही या लेखातून जाणून घेऊ शकता

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 06, 2024 | 11:56 AM
IPL लिलावात अनेक खेळाडूंची नोंदणी

IPL लिलावात अनेक खेळाडूंची नोंदणी

Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीगची (IPL) क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेळी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव होणार आहे, जो 4 वर्षांतून एकदा आयोजित केला जातो. BCCI ने आता IPL 2025 च्या मेगा लिलावाचे ठिकाण आणि तारखा जाहीर केल्या आहेत.

बीसीसीआयने घोषित केल्यानुसार, 24-25 नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी उशिरा लिलावाची माहिती जाहीर केली. बहुप्रतिक्षित कॅश रिच लीग IPL 2025 च्या खेळाडूंचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केल्याची माहितीही बीसीसीआयने दिली आहे. (फोटो सौजन्य – X.com) 

1574 खेळाडूंची नोंदणी 

BCCI चे सचिव जय शाह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, IPL खेळाडूंची नोंदणी अधिकृतपणे 4 नोव्हेंबर 2024 रोजी बंद झाली आहे, एकूण 1,574 खेळाडूंनी ज्यामध्ये 1,165 भारतीय खेळाडू आणि 409 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे त्यांनी मेगा IPL 2025 खेळाडूंच्या लिलावाचा भाग होण्यासाठी अर्ज केला असून साईन अप केले आहे. हा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी दोन दिवस आयोजित करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. 

बीसीसीआयने केले जाहीर

✍️ 1574 Player Registrations 🧢 320 capped players, 1,224 uncapped players, & 30 players from Associate Nations 🎰 204 slots up for grabs 🗓️ 24th & 25th November 2024 📍 Jeddah, Saudi Arabia Read all the details for the upcoming #TATAIPL Mega Auction 🔽🤩 — IndianPremierLeague (@IPL) November 5, 2024

हेदेखील वाचा – CSK मध्ये हा दिग्गज 10 वर्षांनंतर संघात परतणार! IPL 2025 मध्ये कहर करणार

कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडू

या यादीत 320 कॅप्ड खेळाडू आणि 1,224 अनकॅप्ड खेळाडू आहेत. तसेच असोसिएट नेशन्सच्या 30 खेळाडूंचा समावेश आहे, 48 कॅप्ड भारतीय खेळाडूंचा लिलावात समावेश केला जाईल, तर 272 कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील लिलावात उपलब्ध असतील असेही सांगण्यात आले आहे. 

त्यात म्हटले आहे की, गेल्या आयपीएल हंगामाचा भाग असलेले 152 अनकॅप्ड भारतीय खेळाडू आणि गेल्या आयपीएल हंगामाचा भाग असलेले 3 अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील लिलावात समाविष्ट केले जातील. निवेदनात म्हटले आहे की 965 अनकॅप्ड भारतीय आणि 104 अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

204 जागा रिकाम्या

IPL 2025 पूर्वी सर्व 10 फ्रँचायझींनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले होते. यानंतर एकूण 204 खेळाडूंच्या जागा रिक्त झाल्या. या 204 जागा भरण्यासाठी 24-25 नोव्हेंबर रोजी एक मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे, ज्यासाठी भारतासह जगभरातील एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यामुळे आता या लिलावात कोणाकोणाचा नंबर लागणार आहे याची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागून राहिली आहे. 

हेदेखील वाचा – WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासह 5 देशांमध्ये स्पर्धा! टीम इंडियाचं फायनलमध्ये जाणं झालं कठीण

IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी नोंदणी केलेले विविध देशांतील खेळाडू

  • भारत – 1,165
  • दक्षिण आफ्रिका – 91
  • ऑस्ट्रेलिया – 76
  • इंग्लंड – 52
  • न्यूझीलंड – 39
  • वेस्ट इंडिज – 33
  • अफगाणिस्तान – 29
  • श्रीलंका – 29
  • बांगलादेश – 13
  • नेदरलँड्स – 12
  • आयर्लंड – 9
  • झिम्बाब्वे – 8
  • कॅनडा – 4
  • स्कॉटलंड – 2
  • इटली – 1
  • युएई – 1

Web Title: Ipl 2025 auction will be held on 24 25 november in saudi arabia jeddah 1574 players registered for 204 vacant places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 11:56 AM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2025

संबंधित बातम्या

कॅमेरामॅनला इंग्लडच्या प्रशिक्षकाने धक्का दिल्यानंतर पहिल्यांदाच स्वत: सांगितले कोचने! वाचा संपूर्ण प्रकरण
1

कॅमेरामॅनला इंग्लडच्या प्रशिक्षकाने धक्का दिल्यानंतर पहिल्यांदाच स्वत: सांगितले कोचने! वाचा संपूर्ण प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.