फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चेन्नई सुपर किंग्स : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनच्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहेत. यामध्ये आता संघाच्या रिटेन खेळाडूंची नावे समोर आली आहेत. यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंच्या नावाचा समोर आली आहेत. आयपीएल 2025 ची रिटेन्शन लिस्ट जाहीर होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चर्चेत होती आणि आता रिटेन्शन लिस्ट जाहीर झाल्यानंतरही हा संघ चर्चेत आहे. यापूर्वी एमएस धोनी चर्चेचा केंद्रबिंदू होता, मात्र आता रविचंद्रन अश्विन केंद्रस्थानी आला आहे. चेन्नईने एमएस धोनी, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि मथिशा पाथिराना यांना रिटेन केले आहे. आता लिलावासाठी CSK च्या पर्समध्ये 55 कोटी रुपये शिल्लक आहेत.
हेदेखील वाचा – IND vs NZ 3rd Test Live : रिषभ-शुभमनच्या जोडीने केली कमाल, खेळली अर्धशतकीय खेळी
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्जसह इतर अनेक संघ यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर सट्टा लावू शकतात. त्याच्याशिवाय सीएसके रविचंद्रन अश्विनला परत आणण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसते. अश्विनने चेन्नईसाठी यापूर्वी 8 हंगाम खेळले आहेत. एकीकडे, CSK ला टॉप ऑर्डर भारतीय फलंदाज आणि अनुभवी वेगवान गोलंदाजाची जागा भरायची आहे, त्यामुळे ते कोणत्याही खेळाडूवर 15-20 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक बोली लावतील अशी आशा कमी आहे.
TOI नुसार, काही काळापूर्वी अश्विनने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला पुन्हा एकदा त्याच्या जुन्या संघ म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडून खेळायचे आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा स्फोटक सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याच्यावर CSK फ्रँचायझी राइट टू मॅच कार्ड खेळू शकते असे एक अपडेट देखील आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे कॉनवे मागील हंगामात खेळू शकला नव्हता, परंतु आयपीएल 2023 मध्ये त्याने 51.69 च्या सरासरीने 672 धावा केल्या.
हेदेखील वाचा – IND VS NZ :पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया किती धावा करणार? भारताच्या संघाने गमावले ४ विकेट
रविचंद्रन अश्विनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून 97 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 90 विकेट आहेत. या संघासाठी त्याने 190 धावाही केल्या आहेत. पण जेव्हा CSK आणि राजस्थान रॉयल्सवर 2016-2017 हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती, तेव्हापासून अश्विन चेन्नईकडून खेळलेला नाही.
आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला संघाने रिलीज केले आहे. त्याचबरोबर डिफेंडिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विजेता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला संघामधून बाहेर करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, टिळक वर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन केले आहे. तर चेन्नईच्या संघाने एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि माथेशा पाथीराणा यांना रिटेन केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहलीला कर्णधार पदासाठी निवडले आहे.