IPL 2025: Mumbai Indians in rhythm suffer a setback! The player who excelled in his debut is out of the IPL, 'this' replacement player joins the team..
IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत ४९ सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला सुर गवसला आहे. लागोपाठ पाच सामने जिंकून एमआय विजयी लयीत परतली आहे. अशातच मुंबईला खूप मोठा झटका बसला आहे. २४ वर्षीय डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. विघ्नेश पुथूरचा हा पहिला आयपीएल हंगाम होता, ज्यामध्ये त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात आपल्या गोलंदाजीने कमाल कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते. विघ्नेश पुथूरला बाहेर केल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याच्या जागी बदली खेळाडूचे नाव घोषित करण्यात आले आहे.
विघ्नेश पुथूरला आयपीएल २०२५ च्या बाहेर पडावे लागले. विघ्नेशच्याऐवजी मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी लेग-स्पिनर रघु शर्माला संघात सामील करून घेतले आहे. रघु शर्माने पंजाब आणि पुद्दुचेरीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलेले आहे, ज्यामध्ये त्याने ११ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १९.५९ च्या सरासरीने एकूण ५७ विकेट्स घेतल्या आहेत, त्याची सर्वोत्तम कामगिरी ५६ धावांमध्ये ७ विकेट्स ही राहिली आहे.
रघु शर्माने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ९ सामन्यांमध्ये १४ विकेट्स मिळवल्या आहेत. रघुने आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले असून त्यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्स संघाने रघु शर्माला त्याच्या ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर संघात स्थान दिले आहे. जर आपण विघ्नेश पुथूरबद्दल सांगायचे झाले तर त्याने एकूण ५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १८.१७ च्या सरासरीने ६ विकेट्स घेतल्या आहेत.
🚨 VIGNESH PUTHUR HAS BEEN RULED OUT OF IPL 2025. 🚨
– Raghu Sharma has been signed by MI as his replacement. pic.twitter.com/l7rfNiX4Y2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 1, 2025
हेही वाचा : MS Dhoni Retirement : MS Dhoni पुढच्या वर्षीही IPL खेळणार? CSK च्या कर्णधाराचे हसत-हसत उत्तर, वाचा सविस्तर..
मुंबई इंडियन्सची हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२५ ची सुरवात खूपच वाईट राहिली होती. सुरुवातीचे काही सामने अतिशय सुमार कामगिरी केल्याने गमवावे लागले होते. परंतु आता गेल्या ५ सामन्यांमध्ये लागोपाठ विजय मिळवून मुंबई संघाने शानदार पुनरागमन केले आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा प्रबळ दावेदारांपैकी मुंबई इंडियन्स हा एक संघ असल्याचे मानले जाता आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध असणार आहे. १ मे रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर हा खेळला जाईल. मुंबई इंडियन्सचा संघ सध्या १० सामन्यांत १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.