संजू सॅमसन आणि राहुल द्रविड(फोटो सोशल मीडिया)
IPL २०२५ : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात आतापर्यंत 49 सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान वेगवेगळ्या संघातील बऱ्याच खेळाडूंना दुखपतीचा सामना करावा लागला आहे. अशातच राजस्थान रॉयल्सचा नियमित कर्णधार संजू सॅमसन सध्या स्नायूंच्या ताणामुळे संघाबाहेर आहे. त्याच्या दुखापतीबाबत माहिती समोर आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत, संघाची धुरा रियान् पराग सांभाळत आहे. अशा परिस्थितीत, आता आरआर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कर्णधाराच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट दिले आहे.
राहुल द्रविडने बुधवारी माहिती दिली की, संजूची प्रकृती सुधारत असली तरी तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. यामुळे तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता नाही. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी संजू सॅमसनला ही दुखापत झाली होती. यानंतर, तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स विरुद्धही मैदानात खेळताना दिसला नाही. आतापर्यंत तो तीन सामन्यांमधून संघाच्या बाहेर राहिला आहे.
हेही वाचा : MS Dhoni Retirement : MS Dhoni पुढच्या वर्षीही IPL खेळणार? CSK च्या कर्णधाराचे हसत-हसत उत्तर, वाचा सविस्तर..
राहुल द्रविड पुढे म्हणाला की, संजूच्या दुखापतीबाबत फ्रँचायझी कोणतेही घाईघाईने पाऊल उचलण्याच्या तयारीत नाही. तो म्हणाला, “संजू दररोज थोडा बरा होत आहे, पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापती कधीकधी कठीण ठरू शकतात. त्याला आणखी दुखापत होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. म्हणून आम्ही दररोज त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहोत.” असे देखील द्रविडने सांगितले.
द्रविड पुढे म्हणाला की, संघ व्यवस्थापनाला दररोज वैद्यकीय अहवाल मिळत आहेत, ज्यामुळे संजू पुढील सामना खेळू शकेल की नाही याबबत ठरवले जाते. सध्या त्याच्या खेळण्याबाबत कोणतीही हमी देता येत नसल्याचे द्रविडने सांगितले. तसेच तो म्हणाला की, संजू सॅमसनला यापूर्वीही दुखापत झाली आहे. फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेवेळी त्याच्या बोटाला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी देखील, आयपीएलच्या सुरुवातीला, तो विकेटकीपिंग करू शकला नाही आणि फक्त एक फलंदाज म्हणून तो संघात सामील झाला होता.
आता संजू सॅमसण नेमका कधी पुनरागमन करेल आणि तो प्लेऑफपूर्वी मैदानात परतू शकेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण राजस्थान रॉयल्स पुन्हा फॉर्ममध्ये परतले आहे. गेल्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. त्या सामन्यात त्यांनी 200 च्या वरील लक्ष्य सहज पूर्ण केले होत्या. या सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक करण्याचा पराक्रम केला होता.